Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमिर खानने राज ठाकरेंसह साजरी केली रमजान ईद, घराबाहेरील गळाभेटीचा व्हिडिओ समोर

राज ठाकरे यांनी रमजान ईद निमित्त आमिर खानच्या घरी भेट दिल्याचे वृत्त आहे. आमिर खान आणि राज ठाकरे यांचा घराबाहेरील गळाभेटीचा व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 22, 2026 | 02:22 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • आमिर खानने राज ठाकरेंसह साजरी केली ईद
  • घराबाहेरील गळाभेटीचा व्हिडिओ समोर
  • आमिर खान आणि राज ठाकरे यांना पाहून चाहते खुश
 

रमजान ईदचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि याच उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बॉलीवूडमधील खास क्षण समोर आले. तसेच आमिर खान यांनी आपल्या घरी ईद साजरी करताना कुटुंबीय, मित्रपरिवार आणि काही खास पाहुण्यांना आमंत्रित केले होते. या पाहुण्यांमध्ये राज ठाकरे यांची देखील उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. या दोघांचे एकत्र व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहेत.

ईदच्या या खास सेलिब्रेशनदरम्यान आमिर खान आणि राज ठाकरे यांची भेट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारे आमिर खान, राज ठाकरे यांना निरोप देण्यासाठी स्वतः घराबाहेर येताना दिसले आहेत. विशेष म्हणजे, अभिनेता अनवाणी पायांनी बाहेर येऊन त्यांची भेट घेताना दिसत आहे, ज्यामुळे चाहत्यांचे लक्ष अधिक वेधले गेले आहे.

‘कल्कि 2898 AD २’ च्या सीक्वेलसाठी या साऊथ अभिनेत्याची एन्ट्री, शूटिंग लवकरच होणार सुरु

या व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांना मिठी मारताना आणि ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. राज ठाकरे आपल्या कुटुंबासह या भेटीसाठी उपस्थित राहिले होते आणि त्यांनीही पारंपरिक पांढरा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. या प्रसंगी आमिर खानने त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत सणाच्या शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे निघून गेल्यानंतर आमिरने बाहेर उपस्थित फोटोग्राफर्सना पोझ देत चाहत्यांनाही अभिवादन केले.

 

या भेटीमुळे पुन्हा एकदा समाजातील सांस्कृतिक ऐक्याचा सुंदर संदेश समोर आला आहे. विविध धर्म आणि पार्श्वभूमी असलेले लोक एकत्र येऊन सण साजरा करताना दिसणे, हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख असल्याचे अनेकांनी सोशल मीडियावर नमूद केले आहे. दरम्यान, आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्सच्या तयारीत व्यस्त आहे. अलीकडेच त्याने सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून तो फक्त स्क्रिप्ट्स ऐकण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. योग्य कथा निवडून प्रेक्षकांसमोर काहीतरी वेगळं सादर करण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

”लाज वाटायला हवी…”, ‘Dhurandhar 2’ ला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांवर अनुपम खेर यांनी केली जोरदार टीका, व्हि़डिओ पोस्ट करत म्हणाले…

याशिवाय, त्याच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत दोन महत्त्वाचे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. ‘एक दिन’ या चित्रपटात जुनैद खान आणि सई पल्लवी प्रमुख भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर ‘लाहोर 1947’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट ऑगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकूणच, ईदच्या निमित्ताने झालेली आमिर खान आणि राज ठाकरे यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरत असून, त्यातून सणाचा आनंद, आपुलकी आणि सांस्कृतिक ऐक्याचा सुंदर संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Web Title: Raj thackeray went to aamir khan house for ramzan eid celebration video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • entertainment
  • Raj thakcreay

संबंधित बातम्या

Aamir Khan: ‘चौथं लग्न कधी करणार?’, KBC 18मध्ये आमिर खानची एंट्री; प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चौथ्या लग्नाची चर्चा
1

Aamir Khan: ‘चौथं लग्न कधी करणार?’, KBC 18मध्ये आमिर खानची एंट्री; प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चौथ्या लग्नाची चर्चा

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
2

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!
3

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर
4

Bhojpuri Bawal: ‘असली बवाल तर तेजू भय्या…’, तेजप्रताप यादवचा जलवा, चाहत्यांनी घेतलाय शो डोक्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.