Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक टीझर लवकरच; ‘धुरंधर-द रिव्हेंज’सोबत मोठ्या पडद्यावर दिसणार पहिली झलक

'धुरंधर द रिव्हेंज' हा चित्रपट नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून, यासोबत 'राजा शिवाजी'चा दमदार फर्स्ट लूक टीझर चित्रपटगृहांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 19, 2026 | 03:23 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक टीझर लवकरच
  • ‘धुरंधर-द रिव्हेंज’सोबत पडद्यावर दिसणार पहिली झलक
  • ‘राजा शिवाजी’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

जिओ स्टुडिओ आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा दमदार फर्स्ट लूक टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, हा टीझर केवळ चित्रपटगृहांमध्येच पाहायला मिळणार असून तो ‘धुरंधर-द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबत दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे १८ मार्चपासून सुरू होणाऱ्या सशुल्क प्रिव्ह्यूदरम्यान प्रेक्षकांना या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची पहिली झलक अनुभवता येणार आहे. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांसाठी डबल धमाका ठरणार आहे.

‘तुंबाडची मंजुळा’चे गुढीपाडवाच्या निमित्ताने नवं पोस्टर रिलीज; काळ्या पोपटामागचं रहस्य नक्की आहे काय?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि स्वराज्य स्थापनेच्या महान प्रवासाची सिनेमॅटिक झलक मोठ्या पडद्यावर पाहण्याची ही एक खास संधी ठरणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत असून त्यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. एका महान योद्ध्याची गाथा आणि स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष या चित्रपटातून प्रभावीपणे उलगडला जाणार आहे.

या भव्य ऐतिहासिक कलाकृतीला संगीताची साथ अजय-अतुल यांनी दिली आहे, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांनी आपल्या अप्रतिम कॅमेऱ्याद्वारे या गाथेला भव्य आणि दृष्टीसुखद रूप दिलं आहे. चित्रपटाच्या माध्यमातून भारताचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि वारसा जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा निर्मात्यांचा उद्देश आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शौर्य, सन्मान आणि स्वराज्याच्या जन्माला भव्य आदरांजली अर्पण करणारा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Dhurandhar 2 Day 1 Prediction: ओपनिंग डेलाच ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड होणार ब्रेक? पेड प्रीव्ह्यूनेच उडवली खळबळ

इतिहासाची थरारक गर्जना आणि भव्यतेचा नवा अध्याय घेऊन सज्ज झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना एका विलक्षण सिनेमॅटिक प्रवासावर घेऊन जाणार आहे. आता या ऐतिहासिक गाथेची पहिली झलक मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Web Title: Raja shivaji first look teaser theatre only dhurandhar the revenge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
1

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत
2

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
3

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Dasami Marathi Movie: ‘दशमी’चा पहिला पोस्टर प्रदर्शित; महेश मांजरेकरांसह दिग्गज कलाकारांची फौज
4

Dasami Marathi Movie: ‘दशमी’चा पहिला पोस्टर प्रदर्शित; महेश मांजरेकरांसह दिग्गज कलाकारांची फौज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.