
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांच्या १७३ व्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ते कमल हासन यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चाहते या चित्रपटाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते. आता, निर्मात्यांनी ‘थलाईवर १७३’ (तात्पुरते शीर्षक) बद्दल त्याच्या दिग्दर्शकापासून ते त्याच्या प्रदर्शन तारखेपर्यंतची संपूर्ण माहिती उघड केली आहे. कमल हासन यांनी सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. तसेच या दोन्ही सुपरस्टार पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
Monalisa Video: कुरळे केस, स्मितहास्य; मोनालिसाचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल
रजनीकांत आणि कमल हासन अभिनीत या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन किंवा लोकेश कनागराज करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. परंतु, अधिकृत घोषणेसह, सुंदर सी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे उघड झाले आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर झालेले नसले तरी, या घोषणेने चाहत्यांना उत्साहित केले आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची कथा आणि संपूर्ण स्टारकास्ट जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता आताच वाढली आहे.
காற்றாய் மழையாய் நதியாய்
பொழிவோம் மகிழ்வோம் வாழ்வோம்! ராஜ்கமல் பிலிம்ஸ் இண்டர்நேசனல் தயாரிப்பில் சுந்தர்.சி இயக்கத்தில் இனிய நண்பர் சூப்பர் ஸ்டார் ரஜினிகாந்த் நடிக்கும் #Thalaivar173 #Pongal2027 @rajinikanth#SundarC#Mahendran@RKFI @turmericmediaTM pic.twitter.com/wBT5OAG4Au — Kamal Haasan (@ikamalhaasan) November 5, 2025
रजनीकांत-कमल हासन चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
कमल हासन यांनी इन्स्टाग्रामवर रजनीकांत आणि सुंदर सी यांच्यासोबतचे स्वतःचे फोटो शेअर केले आणि थलाईवर १७३ च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली. हा चित्रपट पोंगल २०२७ ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “लाइक द वारा, लाईक द रेन, लाईक द रिव्हर, चला पाऊस पडूया, एन्जॉय करूया आणि जगूया. सुंदर सी दिग्दर्शित आणि राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल निर्मित या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत काम करतील. थलाईवर १७३, पोंगल २०२७.” असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
13 कोटी वसूल होणं अशक्यच! Punha Shivajiraje Bhosale चित्रपटाची 5 दिवसांची कमाई फक्त ‘इतकीच’
रजनीकांत आणि कमल हासन ५० वर्षांपासून मित्र
कमल हासन यांनी पोस्टमध्ये त्यांच्या आणि रजनीकांतच्या मैत्रीबद्दल एक टीप देखील शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे की, “हे ऐतिहासिक सहकार्य केवळ भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज शक्तींना एकत्र आणत नाही तर सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन यांच्यातील पाच दशकांची मैत्री आणि सौहार्द साजरे करते.” एक असे बंधन जे कलाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.’ तसेच या दोन्ही अभिनेत्यांची केमिस्ट्री पुन्हा चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.