(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यातील व्हायरल झालेल्या मोनालिसाला कोणी विसरले असेल असं म्हणणं अवघड आहे. त्या काळात तिच्या प्रत्येक व्हिडिओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तिच्या मोहक डोळ्यांनी आणि निरागस हावभावांनी ती थेट लोकांच्या मनात घर करून गेली होती.
मोनालिसाच्या लोकप्रियतेने तिला बॉलिवूडमध्येही प्रवेश मिळवून दिला, परंतु गेल्या काही दिवसांत ती प्रकाशझोतातून दूर झाल्याचं दिसून येतं. तिचे नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर क्वचितच दिसत आहेत, मात्र ती विविध सांस्कृतिक आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहे.
अलीकडेच मोनालिसाचा एक नवा लूक समोर आला आहे, ज्यात सुंदर डोळे,कुरळे केसांसह एका नव्या अंदाजात दिसत आहे. तिचा हा लूक पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्यावर फिदा झाले असून, सोशल मीडियावर तिच्या पोस्ट्सना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
या लूकमध्ये मोनालिसा कुरळ्या केसांसह एथनिक आउटफिटमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. आपल्या या नव्या लूकने तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.या कार्यक्रमात मोनालिसाने केवळ पापाराझींसाठी पोझ दिल्या नाहीत, तर चाहत्यांसोबत फोटो काढून त्यांना खूशही केले. तिचा हा स्टायलिश आणि मोहक अंदाज पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचं भरभरून कौतुक केलं आहे.
महाकुंभ २०२५ मध्ये माळा विकताना व्हायरल झालेली मोनालिसा आता प्रकाशझोतात आली आहे. तिचं नशीब अक्षरशः बदललं असून ती आता सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.व्हायरल झाल्यानंतर मोनालिसा आपल्या गावी परतली होती, पण दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी तिला शोधून काढलं आणि घरी भेट देऊन चित्रपटाची ऑफर दिली. त्यानंतर त्यांनी मोनालिसाला अभिनयाचं प्रशिक्षण दिलं. कसे राहायचं, कसे पोज द्यायचे आणि अभिनय कसा करायचा याचे बारकावे तिला शिकवले.आता मोनालिसा ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. यापूर्वी ती एका म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली होती, आणि आता तिच्या पहिल्या तेलुगू चित्रपट ‘लाईफ’ मध्येही ती झळकणार आहे.






