Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नमित मल्होत्रांच्या ‘रामायण’ची जगभरात धूम; 14 शहरांत घुमला ‘राम’चा जयघोष, Viral Video चर्चेत

नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ चित्रपट रिलीजआधीच चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच तो लाखो चाहत्यांचे मन जिंकत आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याला चाहत्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 05, 2026 | 08:48 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • नमित मल्होत्रांच्या ‘रामायण’ची जगभरात धूम
  • 14 शहरांत घुमला ‘राम’चा जयघोष
  • सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ चर्चेत
 

भारतीय सिनेसृष्टीत सध्या एका भव्य आणि बहुप्रतिक्षित प्रोजेक्टची जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे. ती म्हणजे ‘रामायण’ या सुपरहिट आगामी चित्रपटाची. निर्माता नमित मल्होत्रा यांच्या या महाकाय सिनेमाने आधीच प्रेक्षकांचे मन जिंकायला सुरुवात केली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका खास व्हिडिओमुळे देशभरात ‘राम’चा जयघोष घुमताना पाहायला मिळतो आहे.

बेंगळुरू, अहमदाबाद, भोपाळ, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, जयपूर, कोची, कोलकाता, मेरठ, मुंबई, पुणे, सीतामढी, कडप्पा, हैदराबाद, पानिपत, ग्वाल्हेर आणि बठिंडा अशा अनेक शहरांमध्ये या चित्रपटाची झलक दाखवण्यात आली. विशेष म्हणजे, 14 शहरांबरोबरच 5 मंदिरांमध्येही चित्रपटाची ही झलक सादर करण्यात आली आहे. या प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अक्षरशः अंगावर शहारे आणणारा होता. सध्या सर्वत्र एकच नाद घुमत असताना दिसत आहे.

‘राणाबली’च्या निमित्ताने विजय-रश्मिकाची जोडी पुन्हा पडद्यावर; रायलसीमामधील चित्रीकरण पूर्ण करून मानले आभार!

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसणारी लोकांची भावनिक प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते की, हा चित्रपट केवळ एक सिनेमॅटिक प्रोजेक्ट नसून एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे. भगवान रामांच्या दर्शनाने भारावून गेलेले प्रेक्षक, जयघोष करताना दिसत आहेत. जणू काही एखाद्या उत्सवाचाच माहोल निर्माण झाला होता.

या भव्य प्रोजेक्टचे दिग्दर्शन नमित मल्होत्रा करत आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या आणि कथानकाच्या दृष्टीनेही अत्यंत भव्य असणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत Prime Focus, DNEG (8 वेळा ऑस्कर विजेते) आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांचा सहभाग आहे, ज्यामुळे या प्रोजेक्टची भव्यता आणखी वाढली आहे.

चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाल्यास, यात रणबीर कपूर भगवान रामांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत झळकणार आहेत. तसेच यश रावणाच्या प्रभावी भूमिकेत झळकणार असून, सनी देओल हनुमानाच्या रूपात आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग 2026 च्या दिवाळीत तर दुसरा भाग 2027 च्या दिवाळीत जगभरातील IMAX सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे प्राचीन महाकाव्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्या पद्धतीने सादर करण्यात येणार आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची ओळख अधिक ठळकपणे समोर येईल.

Zee Marathi Serial : रक्ताने माखलेले हात, तारिणीने सासऱ्याला पुराव्यानिशी पकणार? तारिणी मालिकेत नवं वळण

हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आलेल्या या झलकने सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओसोबत शेअर करण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये ‘14 शहरं, 5 मंदिरे, अब्जावधी हृदये, एकच भावना—राम’ असा उल्लेख करण्यात आला आहे, जो या प्रोजेक्टच्या प्रभावाची साक्ष देतो. एकंदरीत, ‘रामायण’ हा चित्रपट केवळ एक सिनेमा नसून एक भव्य सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे. प्रेक्षकांच्या भावना, श्रद्धा आणि आधुनिक सिनेमॅटिक अनुभव यांचा संगम असलेला हा प्रोजेक्ट 2026 मधील सर्वात मोठा आणि संस्मरणीय सिनेमॅटिक इव्हेंट ठरण्याची पूर्ण शक्यता आहे.

Web Title: Ramayana teaser reaction ram chant across india cities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
1

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
2

Avinash Mishra: अविनाश मिश्राने ईशाला केलं प्रपोज, ‘खतरों के खिलाड़ी १५’च्या सक्सेस पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य
3

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी
4

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.