तारिणी देखील हे रिपोर्टस् पाहते तेव्हा दोघांच्याही असं लक्षात येतं की, केदारची आई आणि तारिणीच्या आईला मारणारी व्यक्ती एकच आहे. ही व्यक्ती नेमकी कोण याबाबत आता दोघेही कसून तपास करत आहेत. त्याचवेळी दयानंदला जयरामचा फोन येतो. तेव्हा दयानंद जयरामला म्हणतो की तू थांब मी आलोच तिथे. हा जयराम म्हणजे केदारच्या आईचा मानलेला भाऊ. केदारच्या या मानलेल्य़ा मामाकडे कोणतीतरी महत्वाची माहिती आहे जेव्हा तारिणीला कळतं तेव्हा ती जयरामला ताब्यात घेणार असते.
तारिणी तिथे पोहोचणार तेवढ्यात जयरामचा खून झालेला असतो. रक्ताने माखलेला चाकू आणि कपड्यांवर रक्ताचे डाग असा दयानंद तारिणीला दिसतो. त्यावेळी तारिणीच्या पायाखालची जमिनच सरकते. आतापर्यंत टीम तारिणीने जेवढाही तपास केला त्यामध्ये युवराज किती खालच्या पातळीला जाऊन वागला आहे तारिणी आणि केदारला कळतं. पण आता युवराज बरोबरच दयानंद देखील गुन्हेगार आहे का ? जयरामची हत्या खरच दयानंदने केली का याबाबत आता अनेक संभ्रम आहेत. मालिकेच्य़ा प्रोमोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून असं सांगण्यात आलं की, जयरामचा खून कोणी दुसऱ्यानेच केला, दयानंद यात अडकला आहे जयरामला मारणारा कोणी दुसराच आहे असं नेटकऱ्यांनी कमेंट करत सांगितलं.आता या सगळ्या गुन्ह्यांमागे नेमकं कोण आहे ? हे आता येत्या काही भागात प्रेक्षकांच्या समोर येईल. तारिणी टीमचा हा तपास पुढे कसा जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.






