Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रांझा तेरा हीरिये…’ व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल रोमँटिक गाणं रिलीज, सोशल मीडियावर जबरदस्त क्रेझ

व्हॅलेंटाईन्स वीक स्पेशल रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. तसेच हे गाणं आता सोशल मीडियावर जास्त गाजत आहे. या गाण्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 12, 2025 | 04:03 PM
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

रोमँटिक गाणं ‘रांझा तेरा हीरिये’ अनिल मदनसुरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेलं आता नुकतच प्रदर्शित झाले आहे. हे गाण आपल्या भावनिक कथानक आणि हृदयस्पर्शी सुरावटींमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास सज्ज आहे. या गाण्यात प्रणाली घोगरे आणि गौरव देशमुख यांची नवीन आणि आकर्षक जोडी पाहायला मिळणार आहे. ही जोशी गाण्यामध्ये चाहत्यांना खूपच आवडली आहे. गाण्याचे बोल आणि संगीत अभिमन्यु कार्लेकर यांनी दिले असून, हे व्हॅलेंटाईन्स सीझनसाठी एक परिपूर्ण रोमँटिक ट्रीट ठरणार आहे.

‘सकाळ तर होऊ द्या’, सुबोध भावे आणि मानसी नाईकच्या आगामी चित्रपटाची घोषणा; शूटिंगला सुरुवात!

हे गाणं पी बी ए फिल्म सिटी, पुणे आणि अलिबागच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर चित्रीत करण्यात आले आहे, जे एक भव्य दृश्य अनुभव प्रदान करते. रांझा तेरा हीरिये हे एस के प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झाले असून, निर्माते श्रीनिवास कुलकर्णी आणि मधुसूदन कुलकर्णी आहेत, तर अमोल घोडके यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

 

गाण्याची कथा रवि नावाच्या तरुणाच्या प्रेमावर आधारित आहे, जो वैदेही वर मनापासून प्रेम करतो. दररोज ती आपल्या गावाबाहेरच्या गॅरेजजवळून शहराकडे जाते, आणि रवि नेहमी दुपारी बारा वाजता तिला पाहण्यासाठी वाट बघत असतो. मात्र, त्याला आपले प्रेम व्यक्त करण्याची हिंमत होत नाही. छोटू, जो त्या गॅरेजचा मालक आहे, रविला आपली भावना सांगण्यासाठी प्रोत्साहित करत राहतो. अखेर, छोटू एक युक्ती लढवतो तो रस्त्यावर खिळे टाकतो, ज्यामुळे वैदेहीच्या बाईकचे टायर पंक्चर होते आणि तिला गॅरेजवर थांबावे लागते. रवि तिच्या जवळ जातो आणि अचानक स्वप्नांच्या दुनियेत हरवतो—जिथे ते दोघे लग्न करून आनंदी संसार करत असतात. पण काही क्षणांतच त्याला वास्तवतेची जाणीव होते. वैदेही तिची बाईक दुरुस्त करून निघून जाते आणि रवि पुन्हा एकदा आपले प्रेम व्यक्त करण्यास अपयशी ठरतो. छोटू समजतो की रवि फक्त स्वप्न पाहत राहील, पण प्रत्यक्षात काहीच करणार नाही.

Super Boys Of Malegaon: एक खजूर दुकानदार आणि मजुराने मिळून केला ‘मालेगावचा शोले’, पहा धमाकेदार ट्रेलर

या गाण्याची मनाला भिडणारी कथा, भव्य लोकेशन्स आणि मधुर संगीत यामुळे ते प्रत्येकासाठी खास ठरणार आहे, ज्यांनी कधी तरी कोणावर तरी प्रेम केले, पण आपले प्रेम व्यक्त करण्याची हिम्मत करू शकले नाहीत. या गाण्याच्या चमूतील प्रमुख तंत्रज्ञांमध्ये डीओपी राहुल झेंडे आणि रोहित जेनकेवाड, संपादक अनिल मदनसुरी, कार्यकारी निर्माता संतोष खरात, डीआय कलरिस्ट देवा आव्हाड, आर्ट डायरेक्टर दिलीप कंढारे, मेकअप आर्टिस्ट हर्षद खुळे, हेअर स्टायलिस्ट सोनालिओझा, आणि कॉस्ट्यूम डिझायनर रश्मी मोखळकर यांचा समावेश आहे. लाइन प्रोड्यूसर राम शिंदे आणि प्रोडक्शन मॅनेजर नायुम आर. पठाण यांनी या प्रोजेक्टला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेष आभार किशोर नखाते, वैभव लातुरे, आणि गणेश म्हास्के यांचे आहेत. गाण्याच्या प्रसिद्धीची जबाबदारी सुमित जिंदाल आणि विनया प्रदिप सावंत यांनी सांभाळली आहे. ‘रांझा तेरा हीरिये’ या गाण्याचा ऑडिओ सर्व प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला पाहायला मिळेल.

Web Title: Ranjha tera heeriye valentine day special romantic song released huge craze on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • Valentine Day

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.