
फोटो सौजन्य AI
काही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त प्रभारही होता. मात्र, वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे शहरातील वाहतुकीचा दीर्घकालीन आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले स्थैर्यच विभागाला मिळत नसल्याचे चित्र आहे. वरिष्ठ अधिकारीच एका ठिकाणी टिकत नसतील तर वाहतूक व्यवस्था सुधारणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाहतूक विभागात नव्याने नियुक्त होणारा डीसीपी सर्वप्रथम शहरातील वाहतुकीचा अभ्यास करतो. त्यानंतर महापालिका, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो.
विविध भागांतील वाहतुकीच्या अडचणी समजून घेऊन सुधारणा आराखडा तयार केला जातो. मात्र, हा आराखडा प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ येण्यापूर्वीच बदलीचे आदेश धडकतात, नव्या अधिकाऱ्याला पुन्हा शून्यापासून शहराचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे कार्यपद्धती आणि सुरू असलेल्या योजनांचे सातत्यही बाधित होते.
मध्य प्रदेशासह अन्य राज्यांमधील वाहनेही दररोज शहरातून ये-जा करतात. अशा परिस्थितीत वाहतूक नियंत्रणासाठी केवळ चौकांमध्ये पोलिस तैनात करणे किंवा नियम मोडणा-यांवर दंडात्मक कारवाई करणे पुरेसे ठरत नाही.
वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी कोणत्या वेळी कोणत्या मार्गावर वाहनांची गर्दी वाढते, अतिक्रमणामुळे कुठे कोंडी होते, सिग्नलची वेळ कुठे बदलण्याची गरज आहे, याचे विश्लेषण करून उपाययोजना आखाव्या लागतात.
या प्रक्रियेला वेळ लागतो. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचा कार्यकाळच अनिश्चित असेल तर अशा नियोजनाला गती मिळणार कशी?
साप्ताहिक सुटी, आजारपणाच्या रजा आणि अन्य कारणांमुळे दररोज सुमारे २० टक्के कर्मचारी अनुपस्थित असतात. त्यात रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वजा केल्यानंतर दिवसा वाहतूक नियंत्रणासाठी प्रत्यक्षात केवळ ३५३ कर्मचारी उपलब्ध राहतात.
Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी
नागपूर जिल्ह्यात सुमारे ३२ लाख वाहनांची नोंदणी आहे. यातील निम्मी वाहने शहरात असल्याचे गृहीत धरले तरी शहरातील वाहनसंख्या १६ लाखांपर्यंत पोहोचते. दुसरीकडे, वाहतूक पोलिस विभागातील मंजूर पदांची संख्या ८४३ इतकीच आहे. विशेष म्हणजे, ही पदसंख्या २० ते २५ वर्षांपूर्वीच्या परिस्थितीनुसार निश्चित केली होती. त्यावेळी शहरातील वाहनांची संख्या ५ ते ६ लाखांच्या आसपास असावी.
आज वाहनसंख्येत झालेली प्रचंड वाढ पाहता मनुष्यबळातही त्याच प्रमाणात वाढ होणे अपेक्षित होते. वाहतूक विभागात सध्या मंजूर ८४३ पदांपैकी सुमारे ६०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये एक डीसीपी, एक एसीपी आणि १४ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.मात्र, उपलब्ध मनुष्यबळातील सर्व कर्मचारी रोज रस्त्यावर तैनात करता येत नाहीत.