Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhurandhar रिलीजच्या तोंडावर असताना Ranveer Singh अडचणीत, Kantara वादावरून FIR दाखल

Ranveer Singh 'कांतारा' चित्रपट वादात अडकला. 'दैव्य'ला 'फीमेल घोस्ट' म्हणाल्याने बेंगळुरूमध्ये एफआयआर दाखल. अभिनेत्याने माफी मागूनही कायदेशीर कारवाई सुरू; 'धुरंधर' रिलीजपूर्वी अडचणी वाढल्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 03, 2025 | 09:42 PM
Dhurandhar रिलीजच्या तोंडावर असताना Ranveer Singh अडचणीत (Photo Credit - X)

Dhurandhar रिलीजच्या तोंडावर असताना Ranveer Singh अडचणीत (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • ‘दैव्य’ला ‘GHOST’ म्हणणं रणवीर सिंहला महागात!
  • माफीनंतरही ‘कांतारा’ वादातून FIR दाखल
  • ‘धुरंधर’ रिलीजपूर्वी अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या
मुंबई: अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आता एका नव्या वादात अडकला आहे आणि हा वाद त्याच्या आगामी ‘धुरंधर’ (Dhurendar) चित्रपटाशी नसून ऋषभ शेट्टीच्या गाजलेल्या ‘कांताराः चॅप्टर १’ (Kantara: Chapter 1) या चित्रपटाशी संबंधित आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ (IFFI) कार्यक्रमातील रणवीर सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये रणवीरने ‘कांताराः चॅप्टर १’ मधील त्या सीनची नक्कल करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यात ‘दैव्य’ ऋषभ शेट्टीच्या भूमिकेमध्ये प्रवेश करतात. मात्र, या सीनची नक्कल करताना रणवीरने ‘दैव्य’ला ‘फीमेल घोस्ट’ असे संबोधले, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

बंगळूरूमध्ये एफआयआर दाखल

रणवीर सिंगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि लोकांचा तीव्र रोष पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियावर माफीही मागितली होती. मात्र, त्याच्या माफीनाम्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता हा वाद इतका वाढला आहे की, अखेर या प्रकरणात रणवीर सिंगविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. बंगळूरू येथील एका पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Ranveer Singh in legal trouble, complaint filed for insulting Daiva tradition A Bengaluru-based advocate has filed a complaint against Ranveer Singh for mimicking the Daiva scene from Kantara Chapter 1 at IFFI, alleging the act hurt religious sentiments of the Tulu-speaking… pic.twitter.com/XPiELxBiAm — IndiaToday (@IndiaToday) December 3, 2025

हे देखील वाचा: १७ वर्षांनंतर थिएटरमध्ये येतोय बॉलीवुडचा सर्वात मोठा चित्रपट; ३ तास ३२ मिनिटांचा एक्शन-थ्रिलरचा डोस

काय म्हणाला होता रणवीर?

२८ नोव्हेंबर रोजी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग IFFI मध्ये ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसला. याच दरम्यान त्याने ऋषभच्या ‘दैव्य’ सीनची नक्कल सुरू केली आणि ‘दैव्य’ला ‘फीमेल घोस्ट’ असे संबोधले. यावेळी, बाजूलाच उपस्थित असलेले ऋषभ शेट्टी इशारे करून रणवीरला असे करण्यापासून रोखतानाही दिसले. ‘कांतारा’ चित्रपटाबद्दल बोलताना रणवीर म्हणाला होता, “मी हा चित्रपट पाहिला आहे आणि तुमचा परफॉर्मन्स शानदार होता ऋषभ. खासकरून जेव्हा ‘फीमेल घोस्ट’ तुमच्यात समाविष्ट होते.”

#RanveerSingh literally called Chavundi Mata a GHOST 😡😡😡 Mimicked her in funny way 🙂‍↔️🙂‍↔️🙂‍↔️🙂‍↔️ Man is working hard to make things difficult for #Dhurandhar ‼️pic.twitter.com/HeNyi60lu7 — Pan India Review (@PanIndiaReview) November 29, 2025

माफीही निरुपयोगी

या व्हिडिओवर लोकांचा संताप पाहिल्यानंतर रणवीर सिंगने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत माफी मागितली होती. कोणत्याही व्यक्तीला किंवा भावनांना ठेस पोहोचवण्याचा आपला हेतू नव्हता, केवळ ऋषभ शेट्टीच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक करणे हाच आपला उद्देश होता, असे त्याने स्पष्ट केले होते. परंतु, रणवीरचा हा माफीनामा जनतेने स्वीकारला नसल्याचे दिसत आहे आणि म्हणूनच आता प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. ‘धुरंधर’ चित्रपट प्रदर्शनाच्या तोंडावर रणवीर सिंग एका नव्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे.

हे देखील वाचा: Mrs Deshpande Trailer रिलीज; Madhuri Dixitच्या रहस्यमय भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Web Title: Ranveer singh in trouble as dhurandhar nears release fir filed over kantara controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 09:42 PM

Topics:  

  • Entertainement News
  • kantara 2
  • Ranveer Singh
  • Rishabh Shetty

संबंधित बातम्या

‘जगा आणि जगू द्या’, अखेर ‘धुरंधर’ अभिनेत्रीने सोडले मौन! २० वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत रोमान्स करण्यावर सारा अर्जुनचे सडेतोड उत्तर
1

‘जगा आणि जगू द्या’, अखेर ‘धुरंधर’ अभिनेत्रीने सोडले मौन! २० वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत रोमान्स करण्यावर सारा अर्जुनचे सडेतोड उत्तर

‘Dhurandhar’ चा सिक्वेल ‘Dhurandhar 2 – The Revenge’  धमक्यासाठी सज्ज; टीझरला सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ प्रमाणपत्र
2

‘Dhurandhar’ चा सिक्वेल ‘Dhurandhar 2 – The Revenge’ धमक्यासाठी सज्ज; टीझरला सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ प्रमाणपत्र

वडीलांनी मारहाण केली, अंगावर वळ उमटले त्याच अवस्थेत मालिकेचा प्रोमो केला शुट; ‘या’ मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा
3

वडीलांनी मारहाण केली, अंगावर वळ उमटले त्याच अवस्थेत मालिकेचा प्रोमो केला शुट; ‘या’ मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.