Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kushal Badrike–Atharva Sudame Controversy: कुशल बद्रिकेची तक्रार अन् अथर्व सुदामेची जाहीर माफी; नेमकं घडलं तरी काय?

Kushal Badrike–Atharva Sudame Controversy: कुशल बद्रिके आणि अथर्व सुदामे यांच्यात कांदे-पोह्यांवरून सुरू झालेला वाद चर्चेत आला आहे. कुशल बद्रिकेने व्हिडिओ शेअर करत अथर्वने कलाकारांना घरी बोलावूनही कांदे-पोहे न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुशलने तो डिलीट केला..

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 18, 2026 | 06:09 PM
Kushal Badrike–Atharva Sudame Controversy (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Kushal Badrike–Atharva Sudame Controversy (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरे कुशल बद्रिके आणि अथर्व सुदामे यांच्यामध्ये सध्या कांदे-पोह्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. कुशल बद्रिकेने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत अथर्व सुदामेवर गंभीर आरोप केला होता. घरी बोलावून कांदे-पोहे न देणे हा पाहुणचाराचा अपमान आहे, असे कुशल म्हणाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आता या सगळ्या वादावर अथर्व सुदामेने स्वतः पुढे येऊन उत्तर दिले आहे.

अथर्व सुदामेने काय पोस्ट केली?

अथर्वने इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ टाकला आहे. त्या व्हिडिओत तो अगदी नम्रपणे माफी मागताना दिसतो. तो म्हणाला, “मित्रांनो नमस्कार, मी हा व्हिडिओ खास माफी मागण्यासाठी बनवला आहे. मी खरंच सगळ्या कलाकारांना घरी बोलावलं होतं, पण मला त्यांना साधे कांदे-पोहे पण देता आले नाहीत. त्यामुळे कलाकार माझ्यावर नाराज झाले, आणि तुम्ही लोक पण मला बोललात की सुदामे असं करणं बरोबर नाही. घरी बोलावून कांदे-पोहे न देणं हे चुकीचं आहे.”

त्यावर उपाय म्हणून अथर्वने एक भारी शक्कल लढवली आहे. तो म्हणाला, “म्हणून मी आता ‘सुदाम्यांचे कांदे पोहे’ नावाचाच एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम फक्त कलाकारांसाठी नाहीये, तर माझ्या सगळ्या चाहत्यांसाठी आहे. 9 नोव्हेंबरला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. याला यायचं असेल तर तुम्हाला तिकीट घ्यावं लागेल.” या पोस्टनंतर अथर्वच्या चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतले आहे. कमेंटमध्ये लोक म्हणत आहेत की, आता नक्की जाऊन कांदे-पोहे खाणार.

Kushal Badrike on Atharva Sudame: ‘व्हिडीओवर अपमान करता तोपर्यंत …

कुशल बद्रिके नक्की काय म्हणाला होता?

खरं तर कुशल बद्रिकेने तो व्हिडिओ रागातून बनवला होता. तो म्हणाला होता, “नमस्कार, हा व्हिडिओ मी आजपर्यंत कधीच बनवला नव्हता, कारण असा वाईट अनुभव मला कधीच आला नव्हता. अथर्व सुदामेने आम्हा सगळ्या कलाकारांना सांगितले की माझ्याकडे कांदे-पोह्यांचा कार्यक्रम आहे, घरी या. आम्ही पण आनंदाने गेलो, चला सुदाम्याचे फेमस कांदे-पोहे खायला मिळतील. पण तिथे गेल्यावर कळले की एकालाही कांदे-पोहे मिळालेच नाहीत.

“तो पुढे म्हणाला, “तू तुझ्या व्हिडिओत लोकांची मजा घेतोस, रोस्ट करतोस, ते एकवेळ ठीक आहे. पण घरी बोलावून अशा प्रकारे अपमान करणे मला पटले नाही. तुला माझा आक्षेप आहे.” असे बोलून कुशलने व्हिडिओ संपवला होता. नंतर वाद वाढताना दिसताच कुशलने तो व्हिडिओ डिलीट पण केला.

Mamachya Govyala Jauya : गोव्यात साऊथ इंडियन तडका! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’मधील ‘वणक्कम’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

आता लोकांना वाटतंय की हे सगळं आधीपासून ठरलेलं होतं का? कारण भांडण ज्या कांदे-पोह्यावरून झालं, त्याच नावाने शो काढणे, हा एक प्रकारचा प्रमोशन स्टंट असू शकतो. असो, पण 9 नोव्हेंबरचा शो आता हिट होणार हे मात्र नक्की.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुशल बद्रिके आणि अथर्व सुदामे यांच्यात वाद कशावरून झाला?

    Ans: अथर्वने कलाकारांना घरी बोलावूनही कांदे-पोहे न दिल्यामुळे कुशलने नाराजी व्यक्त केली होती.

  • Que: अथर्व सुदामेने माफी कशी मागितली?

    Ans: त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून माफी मागितली.

  • Que: ‘सुदाम्यांचे कांदे पोहे’ कार्यक्रम कधी होणार आहे?

    Ans: बातमीनुसार, हा कार्यक्रम 9 नोव्हेंबरला होणार आहे.

Web Title: Kushal badrike atharva sudame kande pohe controversy pune event rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • Entertainement News
  • kushal badrike
  • Marathi News

संबंधित बातम्या

“साहेब परत या, महाराष्ट्राला…” – Prasad Oakने लावला आनंद दिघेंना कल्पनेचा फोन, ऐकून अंगावर काटा आला
1

“साहेब परत या, महाराष्ट्राला…” – Prasad Oakने लावला आनंद दिघेंना कल्पनेचा फोन, ऐकून अंगावर काटा आला

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल
2

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल

Diwali Bonus 2025-26: दिवाळीआधी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! थेट 13,816 रुपयांचा बोनस, कोणाला होणार फायदा?
3

Diwali Bonus 2025-26: दिवाळीआधी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! थेट 13,816 रुपयांचा बोनस, कोणाला होणार फायदा?

Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर सज्ज ;पाच दिवस वाहतुकीचे विशेष नियोजन
4

Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर सज्ज ;पाच दिवस वाहतुकीचे विशेष नियोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.