सलमान खान हा बॉलीवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. या अभिनेत्याचे लग्न झालेले नसले तरी प्रेयसी किंवा लग्नासंबंधीचे त्याचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. आता याचदरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो अभिनेत्री मल्लिका शेरावतला स्त्रियांविषयी प्रश्न करत आहे.
सलमान खानने सुंदर स्त्रियांवर विचारला प्रश्न
अलीकडेच भाईजानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याचे आणि मल्लिका शेरावतमधील संवादाने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ ‘दस का दम 2’ या गेम शोचा आहे. Reddit वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान म्हणतो की असे का घडते की सुंदर स्त्रिया सहसा अशा पुरुषांशी लग्न करतात जे खूपच सामान्य किंवा सरस दिसतात. यावर मल्लिका उत्तर देते की स्त्रिया दिसण्याला सर्वोच्च प्राधान्य देत नाहीत, तर त्या समोरच्या व्यक्तीचे चारित्र्य आणि बुद्धिमत्ता पाहतात. असे तिने या प्रश्नाला उत्तर दिले. सलमान म्हणाला, “मी किती वेळा पाहिलं आहे की खूप सुंदर मुली साधे दिसणाऱ्या पुरुषांशी लग्न करतात किंवा ते त्यांचे बॉयफ्रेंड असतात. हे का? कृपया मला समजावून सांगा?” असे तो तिला विचारतो.
Mallika Sherawat teaching Salman Khan a thing or two..
byu/laylaa25 inBollyBlindsNGossip
हे देखील वाचा- के के मेनन देसी शेरलॉक होम्सच्या भूमिकेत दिसणार, रणवीर शौरीसोबत बनणार केमिस्ट्री!
मल्लिकाने दिले चोख उत्तर
यावर मल्लिका म्हणते, “कारण दिसणं तितकसं महत्त्वाचं नसतं. मन जास्त महत्त्वाचं आहे. स्त्रियांसाठी माणसामधील हुशारी महत्वाची वाटते” असे ती म्हणाल्या नंतर, सलमान लगेच म्हणतो, ‘महिलांची विचारसरणी आश्चर्यकारक आहे की त्यांच्याकडे दिसायलाही काही नाही, पैसा नाही, काहीही नाही तरीही… तुम्ही देवीसारखे आहात.’ असे तो म्हणतो. रेडिटवर हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी मल्लिकाचे कौतुक करण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, ती खूप सुंदर आहे. दुसऱ्याने टिप्पणी केली, “बॉलिवूड आणि प्रेक्षकांनी मल्लिकाला खूप वाईट वागणूक दिली”, चाहत्यांनी तर सलमान आणि मल्लिकाला रोमँटिक कॉमेडी चित्रपटात कास्ट करण्याची मागणी केली आहे.






