Salman Khan च्या आवाजातील ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाणे रिलीज ( सौजन्य - सोशल मीडिया )
Divorce News: ‘या’ प्रसिद्ध गायिकेचं दुसरं लग्नही मोडलं, ४ वर्षच केला संसार; सर्व फोटो केले डिलीट
नव्या जोडीच्या रूपात सलमान खान आणि चित्रांगदा सिंह या गाण्यात एकत्र दिसत आहेत. या दोघांमधील केमिस्ट्री हे गाण्याचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. गाण्यात चित्रांगदा अत्यंत आकर्षक दिसत असून, सलमान यांचा सहजसुंदर अंदाज आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स या जोडीला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता वाढवतो. दोघांमधील खास बॉन्डिंगमुळे हे नवे गाणे चाहत्यांसाठी अधिकच मनोरंजक ठरत आहे.
‘तेरी सेक्सी ब्यूटी’ या गाण्याला साजिद खान यांनी संगीत दिले असून, गीतलेखनही त्यांनीच केले आहे. तर या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सीझर गोंझाल्विस यांनी केले आहे. सलमान खान यांचा आवाज, आकर्षक संगीताचे ठेके आणि सुंदर सादरीकरण यांमुळे हे गाणे चित्रपटात ग्लॅमरसोबतच मनोरंजनाचीही दमदार मेजवानी ठरणार आहे.
अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. सैनिकांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट त्याचा फर्स्ट लूक आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. आता ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ हे गाणे सर्व प्रमुख म्युझिक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे. या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना सलमान खान यांचा संगीतविश्वातील अंदाज अनुभवता येत असून, चित्रांगदा सिंहसोबतची त्यांची नवी जोडीही पाहायला मिळत आहे.
Ans: गाण्याला बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांनी स्वतः आपला आवाज दिला आहे.
Ans: गाण्यात सलमान खानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
Ans: हे गाणे अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली आणि सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातील आहे.






