JioCinema (फोटो सौजन्य-Instagram)
के के मेनन आणि रणवीर शौरी हे डिटेक्टिव्ह ड्रामा सिरीज ‘शेखर होम’सोबत देसी ‘शेरलॉक होम्स’ आणण्यासाठी सज्ज आहेत. गुरुवारी, जिओ सिनेमाने शेखर (केके मेनन) च्या जगाची एक मनोरंजक झलक देणारा ट्रेलर रिलीज केला. शेखर त्याच्या अतुलनीय गुप्तहेर प्रतिभेने गुन्हेगारी आणि गूढतेचे जाळे उलगडण्याचा प्रयत्न करताना या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
६ भागांची असणार ही सिरीज
याशिवाय या मालिकेत रणवीर शौरी, रशिका दुग्गल आणि कीर्ती कुल्हारी हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शेकर होम ही एक मूळ काल्पनिक मालिका आहे जी सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या साहित्यकृतींद्वारे प्रेरित आहे जी सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. 6 भागांची बनलेली ही मालिका बीबीसी स्टुडिओ प्रॉडक्शन इंडियाने तयार केली आहे. तसेच या सिरीजचे रोहन सिप्पी आणि सृजित मुखर्जी दिग्दर्शक आहेत.
ट्रेलरमध्ये काय दाखवले आहे
या मालिकेची कथा 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला बंगालमधील लोनपूर या शांत शहरात बेतलेली आहे. ही एका कालखंडाची गोष्ट आहे जेव्हा लोकांना तंत्रज्ञानाची माहिती नव्हती आणि मानवी बुद्धिमत्तेवरच विश्वास ठेवला जात होते. यावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये के के मेनन ‘शेखर होम’ची मुख्य भूमिका आहे. जयव्रत साहनी उर्फ रणवीर शौरीला भेटल्यावर त्यांना मित्राची गरज असते. दोघे एक जोडी बनतात आणि पूर्व भारताचे रहस्य सोडवण्यासाठी प्रवासाला निघतात. या नंतर काय काय घडते हे सगळं तुम्हाला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. ही मालिका १४ ऑगस्टला जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना यावर ही मालिका पाहता येणार आहे.