(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक असलेल्या ‘पुष्पा: द राइज’च्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. यापूर्वी ‘पुष्पा 2’ यावर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु ‘स्त्री 2’ आणि इतर कारणांमुळे हा चित्रपट आता डिसेंबरमध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने एंट्री घेतली असल्याचे समोर आले आहे.
‘पुष्पा 2’ची चर्चा होत आहे
‘पुष्पा 2’च्या प्रत्येक अपडेटने लोकांमध्ये चित्रपटाशी संबंधित उत्सुकता वाढवली आहे. अल्लू अर्जुन पुन्हा एकदा लाल चंदनाची तस्करी करताना आणि पोलीस आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना दिसणार आहे. याआधीच्या चित्रपटात ‘पुष्पराज’ या व्यवसाय वाढताना दिसला होता, तर ‘पुष्पा २’मध्ये तो राजाप्रमाणे राज्य करताना दिसणार आहे.
‘पुष्पा २’मध्ये श्रद्धा कपूरची होणार एंट्री?
‘पुष्पा 2’च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर त्यातही स्टारकास्ट सारखेच आहेत. मात्र, काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. शेवटच्या भागात सामंथा रुथ प्रभूने अल्लू अर्जुनसोबत ‘ओ अंतवा’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. आता याचबाबत, अशी बातमी समोर आली आहे की यावेळी तिच्या जागी श्रद्धा कपूर दिसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा 2’ मध्ये आयटम डान्ससाठी अनेक अभिनेत्रींना अप्रोच करण्यात आले होते. अखेर निर्मात्यांचा शोध श्रद्धा कपूरवर थांबला. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात ती अल्लू अर्जुनसोबत एका खास आयटम डान्समध्ये दिसणार आहे. असे झाले तर दक्षिण आणि उत्तरेतील या दोन बड्या स्टार्सना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी हे स्वप्नापेक्षा कमी नाही आहे.
हे देखील वाचा – किशोर कुमार यांच्यावर बनणार बायोपिक, आमिर खान दिसणार मुख्यभूमिकेत? अनुराग बसूशी केली हातमिळवणी
‘छावा’ला टक्कर देणार ‘पुष्पा २’
Mythri Movie Makers च्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत ‘पुष्पा 2’ रिलीज होणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला टक्कर देणार आहे. दोन्ही चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहेत. अशा परिस्थितीत कोण कोणावर मात करणार हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे.