(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आता लवकरच नीलमसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. तो नीलम उपाध्यायशी लग्न करत आहे. सध्या दोघांचेही लग्नापूर्वीचे विधी सुरू झाले आहेत. तसेच या दोघांच्या लग्नसोहळ्याची फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. आज बुधवारी हळदीचा समारंभ यशस्वी पार पडला आहे. प्रियांका चोप्रा तिच्या सासूसोबत तिच्या भावाच्या हळदी समारंभात पोहोचली आहे. यादरम्यान ती जोरदार नाचताना देखील दिसली आहे.
प्रियांका चोप्राने हळदीत जोरदार डान्स केला
सिद्धार्थ आणि नीलमच्या लग्नाच्या विधींमधील सुंदर फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. एका व्हिडिओमध्ये सिद्धार्थच्या हळदीच्या विधीचं होळीत रूपांतर झाल्याचं दिसून आले आहे. त्याच्या मित्रांनी हळद लावताना त्याचा संपूर्ण कुर्ता फाडला आहे. याशिवाय चोप्रा कुटुंबातील सदस्यांनी खूप मजा केली. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास जोरदार नाचताना दिसले आहेत. या सोहळ्यात सगळे आनंदी आणि कल्ला करताना दिसले आहेत.
प्रियांका चोप्राच्या सासू भारतीय पोशाखात दिसल्या
प्रियांका चोप्राची सासू डेनिस मिलर जोनास देखील सिद्धार्थ चोप्राच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी भारतात आल्या होत्या. अलिकडेच, जेव्हा प्रियांका चोप्रा तिच्या भावाच्या हळदी समारंभाला जाताना दिसली, तेव्हा तिच्या सासूबाईही तिच्यासोबत गाडीत दिसल्या. प्रियांकाने नमस्ते म्हणत पापाराझींचे स्वागत केले. प्रियांका पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिच्या सासूबाईही भारतीय पोशाखात दिसत होत्या. तसेच या दोघेही व्हिडीओमध्ये आनंदी दिसत आहेत.
दिसण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना खुशी कपूरने सुनावले खडेबोल, नेमकं अभिनेत्री काय म्हणाली ?
मन्नारा चोप्रा तिच्या आईसोबत झाली सहभागी
भाव सिद्धार्थच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मन्नारा चोप्रा देखील आली आहे. यादरम्यान, ती पापाराझींसाठी पोज देताना दिसली. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मन्नारा खूप गोंडस दिसत होती. यावेळी मन्नाराची आईही तिच्यासोबत दिसली. तसेच चाहत्यांना तिचा लूक आवडला आहे.