(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
ब्रिटिश गायक एड शीरन गुरुवारी चेन्नईतील वायएमसीए ग्राउंड्समध्ये त्यांचा संगीत कार्यक्रम सादर करणार आहे. या संगीत कार्यक्रमापूर्वी, तो गायक-संगीतकार ए.आर. रहमान आणि त्यांचा मुलगा ए.आर. अमीन यांना भेटला. ए.आर. रहमान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच गायक एड शीरनचे त्यांच्यासोबतचे फोटो पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. या फोटोला चाहते चांगलाच प्रतिसाद देत आहेत.
प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप, तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?
एकत्र घालवलेला वेळ
रहमानचा मुलगा अमीनने मंगळवारी त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शीरन आणि रहमानसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये, शीरन रहमान आणि अमीनसोबत पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, ब्रिटिश गायक एड शीरन आणि रहमान एका संगीत स्टुडिओमध्ये दिसत आहेत. एड शीरन रेहमानचा फोटो क्लिक आता सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत गाणे गायले
एड शीरनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो रहमानच्या केएम कॉलेज ऑफ म्युझिक अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसोबत त्याचे ‘परफेक्ट’ हे गाणे गाताना दिसत आहे. त्यांच्यासोबत विद्यार्थीही गात आहेत. एड शीरनने या व्हिडिओसोबत एक कॅप्शनही लिहिले आहे – ‘आज चेन्नईमध्ये एका महान गायकांच्या गटासोबत गाणे गायले.’ असे लिहून गायकाने ही पोस्ट शेअर केली आहे.
चेन्नई शहराचा आनंद घेत आहे
अलिकडेच एड शीरन हैदराबादमध्ये असताना त्याने शहराचा दौरा केला. यावेळीही तो चेन्नई शहराच्या दौऱ्याचा आनंद घेत आहे. त्याने चेन्नईमध्ये डोक्याची मालिश करतानाचाही व्हिडीओ शेअर केला आहे . गायकाने हा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. एड शीरन लवकरच दिल्ली-एनसीआरमध्ये एक संगीत कार्यक्रम सादर करणार आहे. या गायकाचा संगीत कार्यक्रम १५ फेब्रुवारी रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये होणार आहे, यासोबतच त्याचा संगीत दौराही संपणार आहे.