(फोटो सौजन्य- Social Media)
अनुपमा या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये वनराजची भूमिका साकारणारा अभिनेता सुधांशू पांडे याने या शोचा नुकताच निरोप घेतला आहे. अभिनेत्याने एका व्हिडिओद्वारे याची घोषणा केली असून, हे ऐकून त्याचे चाहते खूप निराश झाले आहेत. यानंतर बातम्या येऊ लागल्या की अभिनेता सलमान खानच्या शो बिग बॉस 18 मध्ये दिसणार आहे. परंतु अभिनेता बिग बॉस रिॲलिटी शोमध्ये दिसणार नसून, तो करण जोहरसह काम करताना दिसणार आहे.
करण जोहरसोबत झाला मोठा करार
मात्र, आता वनराज यांनीच या सर्व गोष्टींना पूर्णविराम देत स्पष्ट केले आहे. त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, तो रिॲलिटी टीव्ही स्टार आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरसोबत एका रिॲलिटी मालिकेत दिसणार आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, सुधांशू आता करण जोहरसोबत ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील द ट्रेटर्स या रिॲलिटी शोचा भाग असेल. आणि त्यांच्यासोबत काम एकत्र काम करताना हा अभिनेता दिसणार आहे.
हे देखील वाचा- सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला दाऊद इब्राहिम टोळीकडून धोका; कुटूंबियांनी केली ‘ही’ मागणी
त्याचा आगामी शो कोणता आहे?
हा शो द ट्रायटर्स या नावाच्या अमेरिकन मालिकेची हिंदी आवृत्ती असणार आहे. करण जोहर याचे सूत्रसंचालन करणार आहे. याविषयी त्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती आणि आता त्यांनी होकार दिला आहे. या शोमध्ये तो स्पर्धक म्हणून दिसणार आहे. या गेमचा एक भाग राहण्यासाठी, स्पर्धकांना अनेक टास्क आणि आव्हाने दिली जातात ज्यात त्यांना सतत चांगली कामगिरी करून पुढे जावे लागते. हे सगळं प्रेक्षकांना या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. हा शो ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित केला जाईल. यासाठी सुधांशूला मोठी रक्कम दिली जात आहे. पैसे देण्याबाबत बराच वेळ चर्चा सुरू होती आणि आता अंतिम बोलणी झाली आहेत.