Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लीजेंडरी प्रोड्यूसर AVM Saravanan यांचे निधन; रजनीकांतच्या ‘शिवाजी द बॉस’ चित्रपटाचे होते निर्माते

प्रसिद्ध तमिळ चित्रपट निर्माते अवियन सरवनन यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. या बातमीमुळे आता इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 04, 2025 | 12:01 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • लीजेंडरी प्रोड्यूसर AVM Saravanan यांचे निधन
  • रजनीकांतच्या ‘शिवाजी द बॉस’चे होते निर्माते
  • अनेक पुरस्कारांनी करण्यात आले सन्मानित
 

तमिळ उद्योग शोकात बुडाला आहे. प्रसिद्ध निर्माते एव्हीएम सरवनन यांचे गुरुवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. सरवनन बऱ्याच काळापासून आजारी होते आणि वयाशी संबंधित आजारांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर उद्योगविश्वात शोक व्यक्त करत आहे, सोशल मीडियावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे, ज्यात रजनीकांत यांचा ‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटाचा देखील समावेश आहे.

‘वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न…’ मलायका अरोराने Ex पती अरबाज खानचे नाव न घेता साधला निशाणा!

आज होणार अंत्यसंस्कार

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एव्हीएम सरवनन यांचे अंत्यसंस्कार आज होणार आहेत. त्यांचे पार्थिव आज दुपारी ३:३० वाजेपर्यंत चेन्नईतील एव्हीएम स्टुडिओमध्ये ठेवण्यात येणार आहे. जिथे कुटुंब, मित्र, चाहते आणि चित्रपट उद्योगातील सदस्य अंतिम दर्शन घेऊ शकतील. त्यानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

एव्हीएम सरवनन यांनी उत्कृष्ट चित्रपटांची केली निर्मिती

एव्हीएम सरवनन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये “नानुम ओरू पेन,” “संसारम अधू मिन्सारम,” “मिनसारा कनावू,” “वेत्तैकरण,” आणि “शिवाजी: द बॉस” यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसने जवळजवळ पाच दशकांपासून चित्रपटांची निर्मिती केली आहे. शेवटचा फीचर फिल्म २०१० मध्ये तयार करण्यात आला होता. आता, त्यांचा स्टुडिओ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे आणि जाहिरातींवर काम करतो.

रश्मिका मंदान्ना राजस्थानमध्ये विजय देवरकोंडासोबत करणार लग्न? अभिनेत्रीने स्वतःच सांगितले सत्य

अनेक पुरस्कारांनी करण्यात आले सन्मानित

एव्हीएम सरवनन यांचे पूर्ण नाव सरवनन सूर्य मणी आहे. ते एव्हीएम सरवनन म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वडिलांनी १९४५ मध्ये सुरू केलेल्या तमिळ उद्योगातील एव्हीएम प्रॉडक्शन्स या प्रमुख प्रॉडक्शन हाऊसचे ते मालक आहेत. त्यांनी निर्माता म्हणून दोन फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकले आहेत. तसेच आता त्यांच्या अचानक जाण्याने चाहते नाराज झाले आहेत.

Web Title: Tamil producer avm saravanan passes away at the age of 86

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • entertainment
  • Film producer
  • tollywood movie

संबंधित बातम्या

अल्लू अर्जुनने हटक्या अंदाजात पत्नीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा;15 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लिहिली भावुक नोट
1

अल्लू अर्जुनने हटक्या अंदाजात पत्नीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा;15 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लिहिली भावुक नोट

‘Aspirants’ सीझन 3 चा दमदार ट्रेलर रिलीज; जुनी मैत्री आणि नव्या सत्तेमधील उलगडणार रहस्य
2

‘Aspirants’ सीझन 3 चा दमदार ट्रेलर रिलीज; जुनी मैत्री आणि नव्या सत्तेमधील उलगडणार रहस्य

जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ ची झलक; BTS व्हिडिओ शेअर करत मेकर्सने दिले चाहत्यांना सरप्राईज
3

जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ ची झलक; BTS व्हिडिओ शेअर करत मेकर्सने दिले चाहत्यांना सरप्राईज

“तो नरकात जळो…” अली खामेनेई यांच्या मृत्यूवर अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य; इंटरनेटवर उडाली खळबळ
4

“तो नरकात जळो…” अली खामेनेई यांच्या मृत्यूवर अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य; इंटरनेटवर उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.