• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • The Magic Of Shreya Ghoshal Voice In The Song Kanha From Ram Kamal Film Binodini

राम कमलच्या “बिनोदिनी” चित्रपटामधील “कान्हा” गाण्याला श्रेया घोषालच्या आवाजाची जादू!

दिग्दर्शक राम कमल यांचा आगामी चित्रपट "बिनोदिनी" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जो बंगालच्या थिएटर थेस्पियन बिनोदिनी दासी यांच्यावर आधारित आहे. तसेच या चित्रपटातील गाण्याला श्रेया घोषालचा स्वरसाज लाभला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 09, 2025 | 10:43 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या “बिनोदिनी – एकटी नातीर उपाख्यान” या चित्रपटातील बहुप्रतिक्षित “कान्हा तोसे ह्रदय ना जोरुंगी” या पहिल्या गाण्याचे अनावरण अहिंद्रा मंच, कोलकाता येथे एका भव्य कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमात अभिनेत्री रुक्मिणी मैत्राचा एक नेत्रदीपक कथ्थक परफॉर्मन्स देखील दाखवण्यात आला होत. ज्यामुळे गाण्याच्या भावना रंगमंचावर जिवंत झाल्या.

चित्रपटातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर सेट केलेले, “कान्हा तोसे ह्रदय ना जोरुंगी” बिनोदिनी दासी गुरुमुख राय यांना पाठिंबा देण्यास सहमती दर्शवते तो क्षण या गाण्यात दाखविण्यात आला आहे. तिचे थिएटर स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होता. बिनोदिनी दासी यांना परिस्थितीचा बळी म्हणून नव्हे तर भावनिक आव्हानांमध्येही, ताकद आणि दृढनिश्चयाने तिची कला आत्मसात करणारी एक लवचिक कलाकार म्हणून चित्रित केले आहे.

राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या गाण्याला संगीत दिग्दर्शक सौरेंद्रो-सौम्योजित यांनी संगीत दिलेले असून सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिच्या सुमधुर आवाजात हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. हे गाणे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या समृद्ध परंपरेत भरलेले आहे. राग मंझ खमाजवर आधारित, या रचनेत कथ्थकचे घटक समाविष्ट आहेत, ज्यांनी जुन्या काळातील भव्यता प्रकट केली आहे. मनिषा बसू, सौविक चक्रवर्ती आणि अव्यान रॉय यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.

चित्रपटात, “कान्हा तोसे ह्रदय ना जोरुंगी” हा एक मुजरा क्रम म्हणून उलगडला आहे, जो काळातील साराशी प्रतिध्वनी करण्यासाठी बारकाईने कोरिओग्राफ केलेला आहे. हिंदुस्थानी भाषेत रचलेली ही गीते, दर्शकांना एका वेगळ्या काळात घेऊन जातात, जे बिनोदिनीच्या आंतरिक गोंधळाचे आणि कलात्मक आकांक्षांचे प्रतिबिंब दाखवतात. “हे गाणे बंगालमधील सर्वात प्रसिद्ध रंगमंच कलाकार, बिनोदिनी दासी यांना मनापासून श्रद्धांजली देणारं आहे. गाण्यात रुक्मिणी अतिशय सुंदर दिसली आणि मला विश्वास आहे की माझ्या प्रेक्षकांना गणिकेच्या भूमिकेत तिचा सुंदर अभिनय आवडेल”, असे दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांचे म्हणणे आहे.

याबाबत गायिका श्रेया घोषाल म्हणाली की, “जवळपास दोन वर्षांपूर्वी, जेव्हा राम कमल मुखर्जी यांनी त्यांचा पहिला बंगाली फिचर फिल्म ‘बिनोदिनी’ बनवल्याचा उल्लेख केला तेव्हा मला त्यांच्यासाठी आनंद झाला. मी राम कमल दादांना त्यांच्या पत्रकारितेच्या दिवसांपासून ओळखते. माझी मुलाखत घेणाऱ्यांपैकी ते बहुधा पहिले होते. संजय लीला भन्साळी यांच्या देवदासमधून मी पदार्पण केले. सौरेंद्रो-सौम्योजित या संगीतकार जोडीने मला हिंदुस्थानी विश्वात नेले.” असे तिने सांगितले.

पुढे श्रेया म्हणाली, मला अजूनही आठवते की आम्ही मुंबईत यशराज स्टुडिओत रेकॉर्डिंग करत होतो आणि दादा (रामकमल) कोलकात्यात शूटिंग करत होते रेकॉर्ड केल्यावर मी गीत कोणी लिहिले आहेत, असे विचारल्यावर सौरेंद्र-सौम्योजित यांनी ते दादांनी लिहिल्याचा उल्लेख केला. मला खूप आश्चर्य वाटले कारण अचूक आणि योग्य भाषेचा वापर त्यांनी या गाण्यात केला आहे. बिनोदिनी दासी, एका प्रतिष्ठित व्यक्तिरेखा आहे. जी जवळजवळ १५० वर्षांपूर्वी पुरुषप्रधान समाजाच्या विरोधात उभी होती. तिची रंगभूमीची देवी म्हणून पूजा केली जाते आणि तिच्या अभिनय कौशल्यासाठी श्री रामकृष्णाने तिला आशीर्वाद दिला होता. रुक्मिणी मैत्रा यांना बिनोदिनी आणि हे गाणे इतके शोभिवंत वाटावे यासाठी माझ्या शुभेच्छा असल्याचे सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने सांगितले.

Farah Khan Birthday: बॅकडान्सर ते कोरियोग्राफर; फराह खानचा बॉलिवूडमधील खडतर प्रवास

देव एंटरटेनमेंट व्हेंचर्स प्रस्तुत आणि प्रमोद फिल्म्स आणि मिश्रित मोशन पिक्चर्स द्वारे संयुक्तपणे निर्मित, ‘एकटी नातीर उपाख्यान’ २३ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. बिनोदिनी हा एक असा चित्रपट आहे जो स्त्रियांच्या न सांगितल्या जाणाऱ्या कथांवर प्रकाश टाकतो आणि स्वप्न पाहण्याच्या धाडसासाठी त्यांना किती किंमत मोजावी लागते यावर भाष्य करतो. ज्याचा आनंद प्रेक्षकांना सिनेमागृहात घेता येणार आहे.

Web Title: The magic of shreya ghoshal voice in the song kanha from ram kamal film binodini

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • Gujrati
  • Shreya Ghoshal

संबंधित बातम्या

Indian Idol ग्रँड प्रीमियर, श्रेया घोषाल आणि जसपिंदर नरुलाने २३ वर्षांनंतर गायले ‘मोर पिया’
1

Indian Idol ग्रँड प्रीमियर, श्रेया घोषाल आणि जसपिंदर नरुलाने २३ वर्षांनंतर गायले ‘मोर पिया’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Diabetes Day 2025 : डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे काय? जाणून घ्या कोणाला जास्त धोका आणि कसे कराल संरक्षण

World Diabetes Day 2025 : डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे काय? जाणून घ्या कोणाला जास्त धोका आणि कसे कराल संरक्षण

Nov 14, 2025 | 09:04 AM
IND vs SA Toss Update : ‘टेम्बा बवूमाने नाणेफेक जिंकले, फलंदाजी करणार! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing

IND vs SA Toss Update : ‘टेम्बा बवूमाने नाणेफेक जिंकले, फलंदाजी करणार! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing

Nov 14, 2025 | 09:04 AM
Share Market Today: भारतीय शेअर बाजारावर होणार बिहार निवडणूकीचा परिणाम! निकालापूर्वी मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता

Share Market Today: भारतीय शेअर बाजारावर होणार बिहार निवडणूकीचा परिणाम! निकालापूर्वी मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता

Nov 14, 2025 | 09:03 AM
AI चाटबॉटला हृदय देऊन बसली 32 वर्षीय जपानी मुलगी, I Love You म्हणत घातला लग्नाचा घाट; इंटरनेटवर Video Viral

AI चाटबॉटला हृदय देऊन बसली 32 वर्षीय जपानी मुलगी, I Love You म्हणत घातला लग्नाचा घाट; इंटरनेटवर Video Viral

Nov 14, 2025 | 09:00 AM
भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन; अक्कलकोट तालुक्यात शोककळा

भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन; अक्कलकोट तालुक्यात शोककळा

Nov 14, 2025 | 08:57 AM
जीवघेण्या कॅन्सरपासून राहा चार हात लांब! Stanford डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीराला होतील फायदे

जीवघेण्या कॅन्सरपासून राहा चार हात लांब! Stanford डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीराला होतील फायदे

Nov 14, 2025 | 08:53 AM
Zodiac Sign: मालव्य राजयोग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांवर होईल आनंदाचा वर्षाव

Zodiac Sign: मालव्य राजयोग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांवर होईल आनंदाचा वर्षाव

Nov 14, 2025 | 08:49 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM
Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Nov 13, 2025 | 07:34 PM
Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Nov 13, 2025 | 07:30 PM
Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Nov 13, 2025 | 07:26 PM
Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Nov 13, 2025 | 07:19 PM
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.