Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता स्वप्निल जोशीच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता ‘मुंबई लोकल’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 23, 2025 | 03:21 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास “मुंबई लोकल” या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला.”मुंबई लोकल” या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती केली असून निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर त्र्यंबक डागा हे सहनिर्माते आहेत. प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर ही नवी फ्रेश जोडी प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

आमिर खान देखील बनला ‘Saiyaara’ चा चाहता, अहान पांडे आणि अनितचे कौतुक करत शेअर केली पोस्ट

आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती आणि आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो “मुंबई लोकल”च्या प्रवासात एकमेकांना पाहतात. तिथून त्यांची गोष्ट सुरू होते. या प्रवासातच त्यांच्या प्रेमकहाणीला हिरवा सिग्नल मिळतो. पण त्यांच्या आयुष्यात अस काय काय घडतं याची रंजक गोष्ट या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. दोघांमध्ये फुलत जाणाऱ्या नात्याप्रमाणेच चित्रपटाचा ट्रेलर ही हळूहळू  उलगडत जातो आणि नक्कीच उत्सुकता वाढवतो. प्रथमेश आणि ज्ञानदा ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने चित्रपटाला नवा मार्ग मिळाला आहे. उत्तम अभिनेत्यांची फौजच या चित्रपटात असल्याने अभिनयाची आघाडी सक्षम आहे. त्याशिवाय लेखन, छायांकन, संगीत अशा सर्वच बाजूंवर हा चित्रपट मजबूत आहे. या सगळ्याचं प्रतिबिंब ट्रेलरमध्ये उमटत आहे. म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच चित्रपटगृहात आणण्यात यशस्वी ठरणार आहे यात शंका नाही. त्यामुळे लोकल प्रवासात फुलणारी प्रेमाची गोष्ट पाहण्यासाठी आता १ ऑगस्टपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

 

Atheist Krishna यांचे निधन; रूपाली गांगुलीने व्यक्त केले दुःख, पंतप्रधान मोदी आणि अक्षयने केले होते कौतुक

“मुंबई लोकल” चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री  ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांना दिसणार आहे, मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे तर विनोद शिंदे हे क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि कलादिग्दर्शक डॉ.सुमित पाटील आहेत. चित्रपटातील गाणी गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांची असून देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी आणि हर्षवर्धन वावरे यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केले आहे तर पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे. असोसिएट प्रोड्यूसर म्हणून निकुंज मालपाणी यांनी काम पाहिले आहे तर नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचे आहे.

 

Web Title: The trailer launch ceremony of the film mumbai local was held in the special presence of actor swapnil joshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • entertainment
  • Mumbai Local
  • Swapnil Joshi

संबंधित बातम्या

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत
1

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
2

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’
3

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका!  ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन
4

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका! ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.