Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sthal: ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडणारा “स्थळ” चित्रपटाचा ट्रेलर लाँच, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित!

मराठी अभिनेता आणि चित्रपट निर्माता सचिन पिळगांवकर यांचा ग्रामीण भागातील लग्नाची रंजक गोष्ट मांडणारा "स्थळ" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 18, 2025 | 10:48 AM
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

“स्थळ” चित्रपटाच्या टिझर आणि गाण्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर बहुचर्चित “स्थळ” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबई येथील लॉ कॉलेज येथे सुप्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लॉ कॉलेजमधील मुख्याध्यापक उपस्थित मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत लाँच करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुलीच्या लग्नाची रंजक गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली असून, ७ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘RD’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ‘या’ तारखेला चित्रपटगृहात दाखल होणार चित्रपट

ॲरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट या चित्रपटातून दाखवली जाणार आहे. विदर्भातील ग्रामीण भागात राहणारी एक तरुणी, शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचं तिचं स्वप्न आणि तिचं लग्न याची गोष्ट या चित्रपटात आहे. त्याशिवाय स्त्री सशक्तीकरण, प्रथा-परंपरा हेही मुद्दे चित्रपटाच्या केंद्रस्थानी दाखवण्यात येणार आहे. या पूर्वी चित्रपटाचा टिझर आणि “पाहुणे येत आहेत पोरी…” हे गाणं लाँच करण्यात आलं होतं. ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता चित्रपटाचा रंजक ट्रेलर समोर आल्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. अनेक महोत्सवांमध्ये दाखवला गेलेला, पुरस्कारप्राप्त असलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

‘छावा’ व्यतिरिक्त ‘हे’ ऐतिहासिक चित्रपटही सापडले होते वादात, तरीही बॉक्स ऑफिसवर मालामाल

सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा यांनी “स्थळ” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जयंत दिगंबर सोमलकर यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. त्यांचा उत्कृष्ट अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ॲरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट “स्थळ” या चित्रपटातून दाखवली जाणार आहे. महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्च रोजी ‘स्थळ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे.

Web Title: The trailer of the film sthal which tells the interesting story of a rural wedding has been launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Sachin Pilgoankar

संबंधित बातम्या

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
1

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान
2

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी
3

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी

Prahaar Movie Song:  सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित
4

Prahaar Movie Song: सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.