'RD' चित्रपटाचं पोस्टर लाँच, 'या' तारखेला चित्रपटगृहात दाखल होणार चित्रपट
मराठी चित्रपट नेहमीच वेगवेगळ्या आणि आकर्षक विषयांवर आधारित असतात, त्यामुळे त्यातली प्रत्येक गोष्ट खास असते. विविध प्रकारच्या चित्रपटांच्या यादीत थ्रिलर सिनेमा हे कमीच असतात. पण आता मार्च महिन्यात एक नवीन मराठी थ्रिलर सिनेमा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या सिनेमात एक अद्वितीय आणि रहस्यमय कथानक असणार आहे, जे प्रेक्षकांना त्यांच्या जागेवर खिळवून ठेवेल. या चित्रपटात ताज्या आणि प्रभावी कलाकारांची कामगिरी दिसून येईल. थोडक्यात, हा सिनेमा एक रोमांचक अनुभव घेऊन येईल, जो मराठी सिनेप्रेमींना नक्कीच आवडेल. चला या नवीन चित्रपटाबद्दल जाणून घेऊया.
रणवीर अलाहाबादियाला आणखी एक झटका; महाराष्ट्र सायबर सेलने ‘या’ दिवशी हजर राहण्याचे निर्देश
आयुष्य सुरळीत सुरू असताना एका धक्कादायक घटनेमुळे आयुष्य कसं ढवळून निघतं याची थरारक गोष्ट आगामी “आरडी” या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २१ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून, नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.
साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहे.
Chhaava Movie: ‘हमारी सबसे बडी कमाई…’, थिएटरमधील छोट्या मुलाने दिलेली गर्जना ऐकून विकी भावुक
एका तरुणाच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना घडते. हा तरुण त्या घटनेचा तपास मित्राच्या मदतीने करू लागतो पुढे अजुन काय घडते? याची अतिशय रंजक गोष्ट “आरडी” या चित्रपटात पहायला मिळणार आहे. पोस्टरवरूनच हा चित्रपट अतिशय स्टायलिश असल्याचं जाणवत आहे. त्यामुळेच आता चित्रपटाविषयीचं कुतुहल वाढलं आहे. नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय हे चित्रपटाचं वैशिष्ट्य असून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी २१ मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे.