Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bandar Movie: अनुराग कश्यप यांच्या ‘बंदर’चा थरारक ‘पिंजरा’ ट्रॅक रिलीज; Bobby Deol च्या रहस्यमय अवताराची जोरदार चर्चा

हे गाणं केवळ उत्साहपूर्ण नाही, तर त्यात एक भयावह, अस्वस्थ आणि गडद वातावरणही जाणवतं. ‘पिंजरा’मधील तीव्र संगीत, दमदार शब्द आणि रहस्यमय सादरीकरणामुळे प्रेक्षकांवर खोलवर प्रभाव पडताना दिसत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 28, 2026 | 01:55 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘बंदर’चा थरारक ‘पिंजरा’ ट्रॅक रिलीज
  • Bobby Deol च्या रहस्यमय अवताराची जोरदार चर्चा
  • चित्रपटात दमदार कलाकारांची फौज 
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलच्या बंदर चित्रपटाबद्दल काही ना काही नवीन अपडेट येत असून प्रत्येक नवीन अपडेट अधिकच डार्क, अंगावर शहारे आणणारी आणइ रंजक होत चालली आहे.आधी दमदार टीझरने आपल्या रॉ इमोशन्स, भीतीदायक अस्थिरता आणि अनपेक्षित पात्रांच्या वेगळ्या दुनियेची ओळख करून देत प्रचंड चर्चा निर्माण केली. त्यानंतर नुकताच ‘क्यूँ मज़ा आ रहा है’ हा ट्रॅक रिलीज झाला. आणि आता निर्मात्यांनी चित्रपटातील पुढचं गाणं ‘पिंजरा’ रिलीज करून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

‘पिंजरा’ या गाण्याला Amit Trivedi यांनी संगीत दिलं असून, त्यांच्या आवाजामुळे गाण्याला अधिक प्रभावी स्वरूप मिळालं आहे. तर गीतकार Sudip Sharma यांनी लिहिलेल्या थेट मनाला भिडणाऱ्या शब्दांनी या ट्रॅकची ताकद आणखी वाढवली आहे.

Bobby Deol च्या रहस्यमय अवताराची जोरदार चर्चा

हे गाणं केवळ उत्साहपूर्ण नाही, तर त्यात एक भयावह, अस्वस्थ आणि गडद वातावरणही जाणवतं. ‘पिंजरा’मधील तीव्र संगीत, दमदार शब्द आणि रहस्यमय सादरीकरणामुळे प्रेक्षकांवर खोलवर प्रभाव पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या ट्रॅकमधून ‘बंदर’ चित्रपटाच्या डार्क आणि थरारक विश्वाची झलक अधिक ठळकपणे समोर आली आहे.

‘पिंजरा’ या गाण्यात Bobby Deol आणि Raj B. Shetty यांची दमदार उपस्थिती पाहायला मिळत आहे. तुरुंगातील एका जल्लोषमय प्रसंगात राज बी. शेट्टी आपल्या विजेसारख्या तडफदार डान्स मूव्ह्सने संपूर्ण महफिल जिंकताना दिसतात.

दुसरीकडे, गाण्याचे गडद आणि रहस्यमय व्हिज्युअल्स Bobby Deol यांच्या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर डेटिंग लाइफच्या खोल गर्तेत घेऊन जातात. या ट्रॅकमध्ये ते वासना, वेड आणि भावनांच्या भोवऱ्यात अडकलेले दिसत असून, Sapna Pabbi यांची गूढ उपस्थिती संपूर्ण गाण्यात सतत जाणवत राहते.‘पिंजरा’मधील डार्क वातावरण, थरारक मांडणी आणि पात्रांच्या गुंतागुंतीच्या भावविश्वामुळे या ट्रॅकने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

या दिवशी चित्रपट होणार रिलीज

व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, “या गोंधळातून सुटका अशक्य आहे!! #Pinjara व्हिडिओ आता रिलीज झाला आहे!
‘बंदर’ ५ जून रोजी चित्रपटगृहांत.”


‘पाताल लोक’, ‘कोहरा’ आणि ‘उडता पंजाब’ यांसारख्या गाजलेल्या कथांचे लेखक Sudip Sharma आणि Abhishek Banerjee यांनी लिहिलेल्या ‘बंदर’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटात दमदार कलाकारांची फौज 

या चित्रपटात Bobby Deol यांच्यासोबत Sanya Malhotra, Sapna Pabbi, Saba Azad, Raj B. Shetty, Riddhi Sen, Indrajith Sukumaran, Jitendra Joshi आणि Nagesh Bhosale यांसारखी दमदार कलाकारांची फौज झळकणार आहे.

सॅफरन मॅजिकवर्क्सचे Nikhil Dwivedi यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, Zee Studios यांची साथ लाभली आहे. ‘बंदर’ हा चित्रपट ५ जून २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Thrilling track pinjara from anurag kashyaps bandar released bobby deols mysterious and intense avatar sparks major buzz online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Bobby Deol
  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Lock Upp 2’मध्ये मिड-वीक डबल एलिमिनेशनचा ट्विस्ट; सूफी मोतीवाला आणि माधुरी ग्रोवर होणार बाहेर?
1

Lock Upp 2’मध्ये मिड-वीक डबल एलिमिनेशनचा ट्विस्ट; सूफी मोतीवाला आणि माधुरी ग्रोवर होणार बाहेर?

२० कोटींचे भव्य सेट, ३० किलोचा लेहेंगा! २४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘या’ चित्रपटाने बदललं बॉलिवूडचं चित्र; आजही जादू कायम
2

२० कोटींचे भव्य सेट, ३० किलोचा लेहेंगा! २४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘या’ चित्रपटाने बदललं बॉलिवूडचं चित्र; आजही जादू कायम

‘ब्लँकेटच्या आतून स्पर्श…,’१३ व्या वर्षी राम कपूरबरोबर शाळेत घडलेलं असं काही की…, अभिनेता खुलासा करत म्हणाला, ‘आणखी स्पर्श..’
3

‘ब्लँकेटच्या आतून स्पर्श…,’१३ व्या वर्षी राम कपूरबरोबर शाळेत घडलेलं असं काही की…, अभिनेता खुलासा करत म्हणाला, ‘आणखी स्पर्श..’

Pravin Tarde Proposal Video : ‘हीरोइनने मला 100 कोटी दिले…’ भर पार्टीमध्ये गुडघ्यावर बसत तरडेंनी केलं प्रपोज, VIDEO व्हायरल
4

Pravin Tarde Proposal Video : ‘हीरोइनने मला 100 कोटी दिले…’ भर पार्टीमध्ये गुडघ्यावर बसत तरडेंनी केलं प्रपोज, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.