Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काजोल आणि ट्विंकलच्या केमिस्ट्रीने जिंकली प्रेक्षकांची मने; प्राइम व्हिडिओवर ठरला टॉप अनस्क्रिप्टेड शो

‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ शोने पहिल्या सीझनच्या अभूतपूर्व यशाचा उत्सव साजरा केला आहे.प्राइम व्हिडिओवरील सर्वाधिक पाहिली जाणारी अनस्क्रिप्टेड मालिका म्हणून विक्रम नोंदवला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 28, 2025 | 06:24 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

भारताची आवडती एंटरटेनमेंट डेस्टिनेशन बनलेल्या प्राइम व्हिडिओने आपल्या अनस्क्रिप्टेड ओरिजिनल मालिकेच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ पहिल्या सीझनच्या अभूतपूर्व यशाचा उत्सव साजरा केला आहे.या पदार्पणातील सीझनने प्रेक्षकांचे भरघोस प्रेम मिळवत प्राइम व्हिडिओवरील सर्वाधिक पाहिली जाणारी अनस्क्रिप्टेड मालिका म्हणून विक्रम नोंदवला आहे. विशेष म्हणजे, हा टॉक शो भारतभरातील 93% पेक्षा जास्त पिनकोडपर्यंत पोहोचला, ज्यामुळे त्याची लोकप्रियता आणि पोहोच स्पष्टपणे जाणवते.

या टॉक शोचे सूत्रसंचालन काजोल आणि ट्विंकल खन्ना यांनी केले असून त्याचे निर्मितीकार्य बनिजे आशिया यांनी केले आहे. सामान्य सीझनमध्ये सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, सैफ अली खान, आलिया भट्ट, कृति सेनन, वरुण धवन, करण जोहर आणि असे अनेक मोठे बॉलिवूड तारे सहभागी झाले होते. याशिवाय विशेष भागात क्रिकेट वर्ल्ड कप चॅम्पियन्स जिमिमा रोड्रिग्ज आणि शेफाली वर्मा यांनीही हजेरी लावली होती. भारतात आणि जगातील 240+ देश आणि प्रदेशांमध्ये स्ट्रीम होत असल्याने टू मच विथ काजोल अँड ट्विंकल हा सर्वात चर्चेत असलेल्या शोमधील एक ठरला असून प्राइम व्हिडिओवरील सर्वात यशस्वी अनस्क्रिप्टेड मालिका म्हणून ओळख मिळवली आहे.

निखिल माधोक, डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स, प्राइम व्हिडिओ इंडिया म्हणाले, “टू मच विथ काजोल अँड ट्विंकलला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद हे सिद्ध करतो की या शोने टॉक शोच्या दुनियेत एक ताजे आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आणला आहे आणि त्यामुळेच तो प्राइम व्हिडिओवरील आतापर्यंतचा सर्वात जास्त पाहिला गेलेला अनस्क्रिप्टेड शो बनला आहे.”
ते पुढे म्हणाले, या शोची खासियत म्हणजे आमच्या होस्ट्सची अद्वितीय जोडी,ज्या पूर्ण मोकळेपणाने आणि बेधडकपणे आपले विचार मांडतात. त्यांची अप्रतिम केमिस्ट्री एकमेकांसोबत आणि सेलिब्रिटी पाहुण्यांसोबत संपूर्ण देशभर चर्चा घडवते, वेगळे आणि ठळक दृष्टिकोन समोर आणते आणि त्यामुळे हा शो खरोखरच हेडलाईनमध्ये राहणारा ठरला आहे.”

‘जशी आहे तशीच’ काम करतेय त्यामुळे अभिनय करण्याची गरज नाही भासली – विजयालक्ष्मी कुंभार
ट्विंकल खन्ना म्हणाली, “थेट सांगायचे झाले तर, काजोल आणि ट्विंकलसोबतचे ‘टू मच’ म्हणजे जणू आपल्या मित्रांसोबत बसल्यासारखे, जेथे वातावरण अगदी घरासारखे असते. येथे प्रत्येकजण आरामात राहू शकतो, मनातील गोष्टी बोलू शकतो आणि त्या आठवणी आठवू शकतो ज्या सहसा फक्त मनाच्या कोपऱ्यातच राहतात. सत्य बोलणे आणि मोकळेपणाने व्यक्त होणे हे आमच्या शोचे खरे आकर्षण आहे. हे सर्व लोकांपर्यंत पोहोचताना, त्यांचे लक्ष वेधताना, प्रेम मिळवताना आणि आमच्या शोतील गोष्टींवर चर्चा सुरू करताना पाहणे अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी आहे.”

काजोल पुढे म्हणाली, “माझ्या करिअरच्या बहुतांश काळात मी प्रश्नांची उत्तरे देणारी होते, मुलाखत घेणारी नाही. ‘टू मच’साठी सोफ्याच्या दुसऱ्या बाजूला बसणे खूपच ताजेतवाने होते. विशेषतः ट्विंकलसारख्या माझ्या ओळखीतील सर्वात विनोदी आणि चपळ बुद्धीच्या महिलेसोबत. पाहुण्यांनीदेखील आपली खरी आणि बेधडक ऊर्जा घेऊन येणे, आणि त्यांनी जगाला दाखवलेली ती बाजू जी क्वचितच दिसते हे सर्व खरोखरच खूप खास होते.”

लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती ‘मृदगंध पुरस्कार २०२५’ दिमाखात वितरण,भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव

Web Title: Too much with kajol and twinkle becomes the top unscripted show on prime video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 06:24 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Reality Show
  • Twinkle Khanna

संबंधित बातम्या

Laughter Chef Season 3 : ईशा मालवीयानंतर ‘या’ अभिनेत्याने सोडलं’लाफ्टर शेफ्स ३’ , जाणून घ्या कारण काय?
1

Laughter Chef Season 3 : ईशा मालवीयानंतर ‘या’ अभिनेत्याने सोडलं’लाफ्टर शेफ्स ३’ , जाणून घ्या कारण काय?

Bigg Boss Marathi 6: मातीतल्या माणसांचा आठवणींचा मेळा! प्रभू आणि रोशन रमले गावाकडच्या दुनियेत
2

Bigg Boss Marathi 6: मातीतल्या माणसांचा आठवणींचा मेळा! प्रभू आणि रोशन रमले गावाकडच्या दुनियेत

नागिनमधील ‘ही’ अभिनेत्री होणार आई ?  मजेदार अंदाजात दिली हिंट, व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव
3

नागिनमधील ‘ही’ अभिनेत्री होणार आई ? मजेदार अंदाजात दिली हिंट, व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव

”८ वर्षे डिप्रेशनमध्ये..”, मानसिक संघर्षावर ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली…
4

”८ वर्षे डिप्रेशनमध्ये..”, मानसिक संघर्षावर ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.