Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’; ७५ हून अधिक गाजलेली मराठी नाटके ओटीटीवर

अल्ट्रा झकास मराठी ओटीटी वर ७५ हून अधिक गाजलेली नाटके आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अशातच आता ही सगळी नाटके कधी आणि कुठे प्रदर्शित होणार जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 25, 2026 | 03:34 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’
  • ७५ हून अधिक गाजलेली मराठी नाटके ओटीटीवर
  • अल्ट्रा झकासचे दमदार मनोरंजन
 

मराठी रंगभूमीची ओळख असलेली ‘तिसरी घंटा’ आता केवळ नाट्यगृहांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती डिजिटल माध्यमातून नव्या उंचीवर पोहोचत आहे. पारंपरिक रंगमंचाचा हा समृद्ध वारसा आता घरबसल्या अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर अल्ट्रा झकास मराठी ओटीटी .घेऊन येत आहे ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’ या विशेष उपक्रमाचा दुसरा पर्व, जो २७ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या उपक्रमांतर्गत प्रेक्षकांना तब्बल ७५ हून अधिक गाजलेली मराठी नाटके एकाच प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहेत. मराठी रंगभूमीने गेल्या अनेक दशकांमध्ये आपल्या वेगळ्या कथा, उत्कृष्ट विनोद आणि हृदयस्पर्शी भावनांमुळे प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. विशेषतः १९८०-९० च्या दशकात टुरिंग टॉकीज आणि दौऱ्यांमुळे ही नाटके महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि नाटकांवर प्रेम करणारा एक निष्ठावान प्रेक्षकवर्ग तयार झाला.

Bigg Boss Marathi 6 : सासूच्या निधनाची बातमी कळताच दिपाली सय्यदच्या अश्रूंचा बांद फुटला, बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहिलात का?

‘इथे लटकला श्याम’ आणि ‘ह्या नारी झाल्याच ना भारी’ यांसारख्या नाटकांनी शेकडो प्रयोग करत लोकप्रियतेचे शिखर गाठले. या नाटकांतील कलाकार घराघरात पोहोचले आणि आजही या नाटकांची लोकप्रियता तितकीच कायम आहे. आता हेच रंगमंचीय अनुभव डिजिटल माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.

या खास संग्रहात ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘यदा कदाचित’, ‘जाऊ बाई जोरात’, ‘बुवा तिथे बाया’, ‘गोपाळा रे गोपाळा’ आणि ‘फादर माझा गॉडफादर’ यांसारखी लोकप्रिय नाटके प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. याशिवाय ‘नवरा म्हणू नये आपला’, ‘चोर चोर चाळीत चोर’ आणि ‘धुमशान’ ही नाटकेही मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहेत.

हा संग्रह विविधतेने परिपूर्ण आहे. कॉमेडी, कौटुंबिक, सामाजिक आणि भावनिक अशा विविध विषयांवर आधारित नाटकांचा यात समावेश आहे. ‘मिस्टर खोटे खरे बोला’, ‘बोल बच्चन’ आणि ‘डिटेक्टिव्ह चंगू मंगू’ ही नाटके प्रेक्षकांना खळखळून हसवतील, तर ‘सासू वरचढ जावई’, ‘माझा पती करोडपती’ आणि ‘आमच्या या घरात’ ही नाटके घरगुती नातेसंबंधांवर हलक्या-फुलक्या शैलीत भाष्य करतात. ‘अधांतर’, ‘मनोमनी’, ‘निष्पाप’ आणि ‘तू तसा मी’ यांसारखी नाटके भावनिक पैलू प्रभावीपणे मांडतात.

‘लाज वाटली पाहिजे, तो माणूस विवाहित आहे!’ कुमार सानूसोबतचा AI फोटो पाहून कुनिकाचा संताप; दिली कारवाईची धमकी

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, “मराठी रंगभूमी ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’ या उपक्रमाद्वारे आम्ही हा समृद्ध वारसा जपत आहोत आणि डिजिटल माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहोत.” आजच्या काळात विविध प्रकारचा डिजिटल कंटेंट उपलब्ध असला तरी दर्जेदार आणि आशयघन नाटकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम आहे. त्यामुळेच ‘तिसरी घंटा’ आता नव्या माध्यमातून पुन्हा एकदा घुमणार आहे. येत्या २७ मार्चपासून हा रंगतदार आणि समृद्ध नाट्यअनुभव तुमच्या स्क्रीनवर अनुभवता येणार आहे, जिथे परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे.

Web Title: World theatre day special tisri ghanta punha ekda marathi natak ott ultra jhakaas 75 plays stream

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठं पाऊल; ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट
1

ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठं पाऊल; ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट

Tumbadchi Manjula: लांब केस, दाट दाढी अन्…, विनोदी भूमिकांनंतर आता साधूच्या भूमिकेत; ओळखलंत का हा मराठी अभिनेता?
2

Tumbadchi Manjula: लांब केस, दाट दाढी अन्…, विनोदी भूमिकांनंतर आता साधूच्या भूमिकेत; ओळखलंत का हा मराठी अभिनेता?

Rajasthan Village : राजस्थानचं हे गाव आहे बॉलिवूडचं फेव्हरेट, इथे पार पडलीये अनेक चित्रपटांची शूटिंग
3

Rajasthan Village : राजस्थानचं हे गाव आहे बॉलिवूडचं फेव्हरेट, इथे पार पडलीये अनेक चित्रपटांची शूटिंग

होम्बळे फिल्म्सची मराठीत दमदार एंट्री! ‘येतो का नाय’ या पहिल्या हिप-हॉप म्युझिकल फिल्मची घोषणा
4

होम्बळे फिल्म्सची मराठीत दमदार एंट्री! ‘येतो का नाय’ या पहिल्या हिप-हॉप म्युझिकल फिल्मची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.