(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कुनिका सदानंद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे संतप्त झाल्या आहेत. या फोटोमध्ये त्या गायक कुमार सानूसोबत दिसत आहेत. मात्र हा फोटो खोटा (एआय जनरेटेड) असल्याचं स्पष्ट होताच कुनिकांने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा फोटो शेअर करणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही अभिनेत्रीने दिली आहे.
हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून तो प्रत्यक्षात खरा नसून बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच स्पष्टपणे बोलणाऱ्या कुनिकांनी काही काळापूर्वी कुमार सानूसोबतच्या अफेअरबद्दलही खुलेपणाने भाष्य केलं होतं. मात्र आता असा बनावट फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आणि असे प्रकार करणाऱ्यांचा निषेध करत, “लाज वाटली पाहिजे, तो माणूस विवाहित आहे,” असेही म्हटले आहे.
कुनिकाने दिली धमकी
कुनिका सदानंद यांनी सोशल मीडियावरील एका युजरवर जोरदार निशाणा साधत त्याच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. कुमार सानूसोबत दिसणाऱ्या त्या बनावट फोटोची पोस्ट त्यांनी रीशेअर करत लिहिले, “लाज वाटली पाहिजे, हा माणूस विवाहित आहे आणि त्याला मुलंही आहेत. तुम्हाला हेही माहिती असायला हवं की, कोर्टाने त्यांना पर्सनॅलिटी राइट्स दिले आहेत. अशा कृतीमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. माझ्या किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला अशा फॅनडम वॉरमध्ये ओढू नका. व्यक्तीच्या हक्कांचा आदर करा. मी तुमच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करत आहे, ही पोस्ट त्वरित हटवा.” असे लिहून अभिनेत्रीने त्याला धमकी दिली आहे.
Sharam karo, this man is happily married and he has kids, you should also know he has personality rights given to him by the court, u will get into trouble for this.😡 Stop dragging him or my personal life fandom wars. Give the due respect to a persons rights. i’m reporting u for… https://t.co/ZaMCcu2VL4 — Kunickaa Sadanand (@Kunickaa) March 24, 2026
कुनिकाने कुमार सानूसोबत प्रेमसंबंध असल्याची दिली कबुली
अलीकडेच ‘बिग बॉस 19’मध्ये दिसलेली कुनिका सदानंद यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘बेटा’, ‘गुमराह’ आणि ‘खिलाडी’ यांसारख्या चित्रपटांत त्या झळकल्या आहेत. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये कुनिकांनी कुमार सानूसोबतच्या त्यांच्या अफेअरबद्दलही खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, त्या काळात कुमार सानू विवाहित होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे अफेअर सुरू होते.
३३ वर्षांची परंपरा कायम! ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाचा ३०० वा प्रयोग रंगणार दादरच्या शिवाजी मंदिरात
सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या एका मुलाखतीत कुनिकाने सांगितले की, त्यांची कुमार सानूसोबत पहिली भेट एका मित्राच्या घरी झाली होती, जिथे ते रेकॉर्डिंग सेशनसाठी आले होते. कुनिका स्वतःही गायनात प्रवीण असल्याने त्या अनेकदा त्यांच्या सोबत शोसाठी टूरवरही जात असत.






