Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कलर्स मराठी’वर मिळणार प्रेक्षकांना दत्तजयंतीनिमित्त भक्तीमय पर्वणी, वाचा केव्हा ?

महाराष्ट्राच्या लाडक्या 'कलर्स मराठी'वरील 'जय जय स्वामी समर्थ','आई तुळजाभवानी' आणि 'इंद्रायणी' या मालिकांमध्ये दत्तजयंती विशेष भाग पार पडणार आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 13, 2024 | 07:03 PM
'कलर्स मराठी'वर मिळणार प्रेक्षकांना दत्तजयंतीनिमित्त भक्तीमय पर्वणी, वाचा केव्हा ?

'कलर्स मराठी'वर मिळणार प्रेक्षकांना दत्तजयंतीनिमित्त भक्तीमय पर्वणी, वाचा केव्हा ?

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर येता रविवार प्रेक्षकांसाठी भक्तीमय पर्वणी घेऊन येणार आहे. आपल्या लाडक्या मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’,’आई तुळजाभवानी’ आणि ‘इंद्रायणी’ या मालिकांमध्ये दत्तजयंती विशेष भाग पार पडणार आहेत. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत स्वामींचं दत्तरुप पाहायला मिळेल. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवीच्या रक्षणासाठी त्रिदेव भूतलावर अवतरणार असून ‘इंद्रायणी’ या मालिकेत दत्तजयंती स्पेशल इंदूचं कीर्तन पाहायला मिळेल. एकंदरीतच 15 डिसेंबरला दुपारी १२ वाजल्यापासून ‘कलर्स मराठी’वर भक्तांना ‘भक्तीमय संध्या’चा अनुभव घेता येणार आहे.

अल्लू अर्जुनला दिलासा, तेलंगणा हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेचा श्री दत्त जयंती विशेष महाएपिसोड दत्तभक्तांसाठी आनंद देणारा ठरणार आहे. या भागात स्वामींच्या अलौकिक श्रीदत्त रुपाचे मनोहारी दर्शन प्रेक्षकांना घडेल. “आम्ही आहोत दत्त गुरु, आम्हीच होतो नृसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ” या उक्तीचा प्रत्यय भक्तांना येणार असून दत्त परंपरेचा स्वामींच्या अलौकिक लीलेने घडणारा हा दैवी साक्षात्कार याची देही याची डोळा अनुभवण्याचा क्षण आहे. प्रत्येक दत्तभक्तांनी आवर्जून अनुभवावा असा हा अविस्मरणीय श्री दत्त जयंती विशेष भाग ज्यामध्ये भक्तांसाठी महत्त्वाची शिकवण देताना स्वामी दिसून येतील.

अल्लू अर्जुनच्या अटकेवर बॉलिवूडमधली पहिली प्रतिक्रिया, वरुण धवन काय म्हणाला ?

‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत येत्या दत्तजयंतीला त्रिमूर्तींच्या साक्षीने आई भवानीने कद्दरासुराला दिलेल्या आव्हानाची न भूतो न भविष्यती अशी रोमांचक गोष्ट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. कद्दरासुराने त्याच्या गुरूच्या सांगण्यावरुन त्रिलोकाचा स्वामी होण्यासाठी भवानीरुपातल्या आदिशक्तीच्या शक्तींना वश करण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यातून उभे राहणारे महानाट्य, त्यात ब्रम्हा – विष्णु – महेश या त्रिदेवांनी त्रिमूर्तीं स्वरूपात प्रकट होणे असा एक अत्यंत अद्भुत चमत्कार आणि दैवी लीलांचा समावेश असलेला श्री दत्त जयंती विशेष महाएपिसोड प्रेक्षकांना पाहता येईल. या विशेष भागात ‘आई तुळजाभवानी’चे आगळेवेगळे रूप पाहण्याची तसेच त्रिमूर्ती प्रकट होण्याचे कारण जाणून घेण्याची प्रेक्षकांना विशेष उत्सुकता आहे.

‘जेवायला सुद्धा दिलं नाही, सरळ बेडरूममधून नेलं…’, अल्लू अर्जुनने अटकेवर केला आक्षेप!

‘इंद्रायणी’ मालिकेच्या महाएपिसोडमध्ये गावावरचं भूताचं संकट इंदू आणि फंट्या गँग मिळून अत्यंत नाट्यमय पद्धतीने सर्वांसमोर आणणार आहेत. गावार आलेलं अंधश्रद्धेचं मोठं वादळ दूर केल्याने सर्वत्र इंदूचं कौतुक होणार आहे. दरम्यान गावकरी इंदूला कीर्तन करण्याचा आग्रह करणार आहेत. इंदूने सत्याची साथ कधी सोडली नाही आणि गावावरचं जे संकट होतं ते दूर केल्याने व्यंकू महाराजदेखील इंदूलाच कीर्तन करायला भाग पाडणार आहेत. त्यामुळे व्यंकू महाराजांच्या उपस्थित इंदू पहिल्यांदाच एकटी दत्तजयंती विशेष कीर्तन करताना दिसून येणार आहे.

15 डिसेंबरला प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या मालिकांचे दत्तजयंती विशेष एका तासाचे महाएपिसोड आपल्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार आहेत.

Web Title: Colors marathi channels in datta jayanti special jay jay swami samarth aai tuljabhawani and indrayani serials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 07:03 PM

Topics:  

  • colors marathi
  • Datta Jayanti
  • entertainment
  • indian television show

संबंधित बातम्या

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
1

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.