भक्तांना मिळणार स्वामींच्या रामरूपात दिव्य आशीर्वाद; ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत रामनवमीचा अलौकिक उत्सव
‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेमध्ये सध्या रामनवमीचा उत्सव साजरा केला जात आहे. रामनवमी निमित्त विशेष भागामध्ये प्रेक्षकांना रामनवमी सप्ताहाचे कथानक, भक्ती, आणि मूल्यांचा एक प्रभावी संगम पाहायला मिळेल. या विशेष महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांसमोर एकीकडे राम आणि सीतेच्या नात्यातील विश्वासाचं गोड तत्व मांडलं आहे. तर दुसरीकडे सत्यवान आणि कलावती या जोडप्याच्या रूपात त्या मूल्यांची आजच्या काळातील गरज दाखवली जात आहे. या दोन्ही कथांमध्ये स्वामींच्या लीलेचा उत्कट परिपाक प्रेक्षक सध्या अनुभवता आहेत.
दरम्यान, स्वामींना रामाच्या रूपात पाहून प्रेक्षक अचंबित झालेले आहेत. स्वामींमध्ये असलेले दैवी तत्व आणि श्रीरामांनी जपलेल्या मूल्यांच्या अनुषंगाने होणारा साक्षात्कार मालिकेच्या आगामी भागातही प्रेक्षकांना अनुभवता येईल. येत्या शनिवारी १२ एप्रिलला हनुमान जयंतीच्या दिवशी या सप्ताहाची महासांगता होणार आहे. स्वामींच्या भक्तांना साजऱ्या केलेल्या रामनवमी उत्सवातल्या संदेशाने “पतीपत्नीच्या नात्यातील विश्वास हा खऱ्या भक्ती इतकाच पवित्र आहे.” हे सांगत गोष्ट पुढे सरकते सत्यवान आणि कलावतीकडे, जे गरिब असूनही परस्परांवर निस्सीम प्रेम करणारे रामभक्त असतात.
शाहरुख खान फॅमिलीसोबत नव्या घरात शिफ्ट झाला, ‘मन्नत’पेक्षा अर्ध आहे किंग खानचं नवीन अपार्टमेंट
मात्र सत्यवानचा अतिरेकी स्वभाव आणि नरहरीची वाकड्या नजरेतून उगम झालेली कटकारस्थानं त्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण करतात. स्वामींची लीला तिला यातून कशी वाचवते आणि याकथेतून स्वामी आताच्या काळातही सुसंगत असलेला संदेश कसा देतात. हे आवर्जून अनुभवण्यासारखे आहे. तेव्हा स्वामींची जीवनमूल्यांची ही शिकवण आवर्जून अनुभवा, रामनवमी विशेष सप्ताहात…