Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धुरंधर’चित्रपटाच्या सेटवरील रणवीर सिंगचे फोटोज् लिक, अभिनेता दिसला चार वेगवेगळ्या लूक्समध्ये…

बॉलिवूडचा मोस्ट एनर्जेटिक अभिनेता म्हणून रणवीर सिंगकडे पाहिलं जातं. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंग सेटवरील फोटोज् व्हायरल होत आहे

  • By चेतन बोडके
Updated On: May 20, 2025 | 08:57 PM
'धुरंधर'चित्रपटाच्या सेटवरील रणवीर सिंगचे फोटोज् लिक, अभिनेता दिसला चार वेगवेगळ्या लूक्समध्ये…

'धुरंधर'चित्रपटाच्या सेटवरील रणवीर सिंगचे फोटोज् लिक, अभिनेता दिसला चार वेगवेगळ्या लूक्समध्ये…

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडचा मोस्ट एनर्जेटिक अभिनेता म्हणून रणवीर सिंगकडे पाहिलं जातं. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’नंतर अभिनेता कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. आता लवकरच अभिनेता एका आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंग सेटवरील काही फोटोज् व्हायरल होत आहेत.

पूजा सावंतच्या नव्या चित्रपटाची घोषणा, शुटिंगचा श्रीगणेशा…

‘धुरंधर’ चित्रपटाच्या माध्यमातून रणवीर सिंग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू असून सेटवरील फोटो लीक झाले आहेत. यात तो चार वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसतो आहे. या लूक्सनी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपट आधीपासूनच चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून रणवीर या चित्रपटासाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन करताना दिसत आहे. बॉडीपासून लूकपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये अभिनेत्याने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. रणवीरने चित्रपटात केलेले ट्रान्सफॉर्मेशन एका नव्या उंचीवर नेलं आहे.

कोण खरं, कोण खोटं? परेश रावल ‘हेरा फेरी ३’ सोडण्यावर दिग्दर्शक प्रियदर्शन काय म्हणाले ?

व्हायरल होत असलेल्या लूकमध्ये, रणवीर एका फोटोमध्ये रायफल हातात घेतलेला दिसतो, चेहऱ्यावर तीव्रता आणि डोळ्यांत रौद्र भाव. केस अर्ध्या अंबाड्यात बांधलेले, सोबत कुर्ता- पायजमा असा रॉ आणि रग्ड स्टाईलचा अंदाज. हा लूक सिनेमाच्या अ‍ॅक्शन-पॅक्ड आणि ग्रिट्टी टोनचा स्पष्ट संकेत देतो. तर, दुसऱ्या लूकमध्ये रणवीर ब्लॅक पठाणी सूटमध्ये दिसत आहे. एकदम स्टायलिश आणि पॉवरफुल. केस अर्धवट अंबाड्यात बांधलेले असून, काही केस मोकळे सोडले आहेत आणि दाढी घनदाट आहे. त्याचा हा लूक करिष्मा आणि उर्जा यांचा उत्तम संगम दाखवतो. एका फोटोत रणवीर ब्राउन पँटसूटमध्ये असून, डोक्यावर गुलाबी पगडी आहे. त्याच्या चेहऱ्यावर घनदाट दाढी आणि शरीरावर बळकटपणा स्पष्ट जाणवतो. त्याचा हा लूक कमांडिंग आणि इन्टेन्स आहे.

‘धुरंधर’चित्रपटाच्या सेटवरील रणवीर सिंगचे फोटोज् लिक, अभिनेता दिसला चार वेगवेगळ्या लूक्समध्ये…

कुटुंबाचं घर की पछाडलेला वाडा? ZEE5 ची पहिली हॉरर वेबसीरीज ‘अंधार माया’ चा ट्रेलर लाँच

प्रेक्षकांमध्ये आदर आणि उत्सुकता निर्माण करणारा. एका व्हिडीओ क्लिपमध्ये रणवीर लांब, विस्कटलेले केस, जाड दाढी, आणि पठाणी कुर्ता-पायजमा परिधान करून दिसतो. हातात सिगरेट आणि डोळ्यांत जबरदस्त तीव्रता यामुळे त्याचा हा लूक अलाउद्दीन खिलजीच्या आठवणी जागवतो. धुरंधर हा चित्रपट केवळ रणवीरच्या अभिनयामुळे नव्हे, तर त्याच्या अंगभूत रूपांतर क्षमतेमुळेही चर्चेचा विषय ठरत आहे. विविध रूपांत प्रेक्षकांसमोर येणाऱ्या रणवीरकडून काय धडाकेबाज परफॉर्मन्स मिळणार आहे, हे पाहणं नक्कीच रोचक ठरणार आहे.

Web Title: Decoding ranveer singh leaked pictures as master of transformation for his much anticipated film dhurandhar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 08:57 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood movies
  • Bollywood News
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?
1

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
2

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
3

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
4

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.