• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Andhar Maya Trailer Launch Zee5 First Marathi Horror Series

कुटुंबाचं घर की पछाडलेला वाडा? ZEE5 ची पहिली हॉरर वेबसीरीज ‘अंधार माया’ चा ट्रेलर लाँच

मराठी अभिनेता किशोर कदम यांची मुख्य भूमिका असलेला 'अंधार माया' या मराठी हॉरर वेबसीरीजचा ट्रेलर लाँच झाला आहे. ZEE5 पहिल्यांदाच मराठी वेबसीरीज प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: May 20, 2025 | 05:26 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्वतःच्या घरी परत परतणे हे प्रत्येकासाठी सुखद असते असे नाही. तसेच वाड्यातील काही दरवाजे न उघडणेच बरे असतात. ZEE5 अशीच एक भयानक कथा प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. ‘अंधार माया’ या पहिल्या मराठी हॉरर ओरिजनल सीरीजचा हादरवून टाकणारा थरारक ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हालाचकित करणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे यांनी दिग्दर्शित केलेली ही वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर ‘अंधार माया’ ची शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी एरिकॉन टेलिफिल्म्सअंतर्गत निर्मिती केली आहे. या मालिकेची कथा आणि संवाद प्रल्हाद कुडतरकर यांनी लिहिले आहे.

‘अंधार माया’ ची पटकथा कपिल भोपटकर यांनी लिहिली आहे. या मालिकेमध्ये दोनदा राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते किशोर कदम हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्यांना पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. एका कुटुंबाच्या भूतकाळाने ग्रासलेल्या पूर्वजांच्या घरात घडणारी ‘अंधार माया’ची गोष्ट कोकणात लपलेली भीती आणि घाबरवणाऱ्या एका शोधाची आहे. रहस्य, गूढरम्य वातावरण आणि भावनांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या सीरीजचे प्रीमियर ३० मे रोजी ZEE5 वर होणार आहे.

हर्षवर्धन राणेंच्या नावाने चाहत्यांची फसवणूक, अभिनेत्याने दिला सावधानतेचा इशारा!

‘अंधार माया’ ही मालिका कोकणातल्या गूढ, काळोख्या, पछाडलेल्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथेसारखी आहे. या मालिकेत एकेकाळी अभिमानाचा विषय असलेला खातू कुटुंबाच्या पूर्वजांचा वाडा सगळ्यांना एका अंतिम विधीसाठी परत आणतो, मात्र या वाड्याच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. सगळ्यांची पुन्हा झालेली एक सुंदर भेट म्हणून सुरू झालेला हा प्रवास गडद होत जातो. कुटुंबात पूर्वापार लपवून ठेवण्यात आलेली गुपितं नकळतपणे उघड होतात आणि विचित्र गोष्टी घडायला सुरु होतात. जसजसे सावल्या ढवळून निघतात आणि भूतकाळ वर्तमानात प्रवेश करतो, तसतसे विचित्र घटना घडायला सुरुवात होते. वाड्याची पकड घट्ट होत जाते तसंच काळाच्या चक्राची पुनरावृत्ती होते. कुटुंबातले सदस्य गायब होऊ लागतात. वाडा पछाडलेला असतो का? की तो स्वतःच्याच वंशांवर जगत असतो? घर स्वतःचे अस्तित्व परत मिळवत आहे का, किंवा काहीतरी अधिक भयानक आहे? हे सगळं ‘अंधार माया’पाहिल्यानंतरच उघड होणार आहे.

झी मराठीचे प्रमुख चॅनेल ऑफिसर आणि झी5चे व्यवसाय प्रमुख व्ही. आर. हेमा यांनी असे म्हटले की, ‘ही तर केवळ सुरुवात आहे. अंधार माया ही पहिली मराठी ओरिजनल हॉरर सीरीज ZEE5 वर लाँच करताना झीला अभिमान वाटत आहे. या नव्या, बोल्ड सीरीजच्या माध्यमातून आम्ही ओटीटी विश्वात नवं पाऊल टाकलं आहे. आम्ही कायम नाविन्यावर भर दिला आहे. झी मराठीसह महाराष्ट्रातील पहिले खासगी जीईसी लाँच करण्यापासून झी टॉकीज आणि झी स्टुडिओजच्या माध्यमातून सिनेमा क्रांती घडवत आम्ही सातत्याने मराठी मनोरंजन विश्वाला नवा आयाम दिला. आता आम्ही डिजिटल पातळीवरही हाच वारसा आपली संस्कृती, गोष्टी, लोकांच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहोत. कोकणातल्या गूढ पार्श्वभूमीवर घडणाऱ्या अंधार मायामध्ये लोककथा, कौटुंबिक नाती आणि मानसशास्त्रीय रहस्यांनी परिपूर्ण गोष्ट पाहायला मिळणार आहे. यातून स्थानिक पार्श्वभूमी असलेल्या कथा आणि सर्जनशील गुणवत्ता दाखवण्याची आमची बांधिलकी दिसून आली आहे. ही एका नव्या, सशक्त अध्यायाची सुरुवात आहे – ज्यातून महाराष्ट्राची स्वप्नं आणि आवाज प्रत्येक स्क्रीनवर, सर्वत्र जिवंत होणार आहे.’

Jyoti Malhotra चे बांगलादेशाशी आहेत खास संबंध, प्रवास फक्त निमित्त; युट्यूबरने का साधली जवळीक?

दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘अंधार माया या सीरीजमध्ये एक घट्ट मुळं असलेलं, पण अतिशय अपरिचित वाटणारं जग उभं करण्यात आलं आहे, जिथं भावना, आठवणी आणि अनैसर्गिक यांचं एकत्रित अस्तित्व आहे. ट्रेलर लाँच करताना या दुनियेचं पहिलं दार उघडल्यासारखं वाटलं. ही सीरीज सर्वांसमोर सादर करताना आनंद होत आहे. ही गोष्ट भूतकाळातल्या भूतांची आहे, तितकीच ती आपल्यात लपलेल्या भीतीचीही आहे. कोकणातला गूढरम्य निसर्ग नेत्रसुखद आणि भावनांनी परिपूर्ण गोष्ट मांडण्यासाठी योग्य पार्श्वभूमी देणारा होता. मला आशा आहे, की प्रेक्षक या सीरीजमध्ये गुंतून जातील, हेलावतील आणि पूर्ण वेळ थरार अनुभवतील, कारण या सीरीजमध्ये काय पाहायला मिळणार आहे याची ही फक्त एक झलक आहे.’

तर अभिनेते किशोर कदम यांनी असे सांगितले की, ‘अंधार माया मालिकेत गोन्याची व्यक्तीरेखा करणं हा माझ्या करियरच्या सुंदर प्रवासातला सर्वात भीतीदायक टप्पा होता. तो मोजकं बोलतो, पण त्याच्या आत कित्येक शतकांची शांतता आणि रहस्यं दडलेली आहेत. ट्रेलरमध्ये आम्ही उभारलेल्या विश्वाची झलक दिसते, पण विश्वास ठेवा, खरा थरार गोष्ट उलगडायला लागल्यानंतर सुरू होईल. ही गोष्ट भावनाप्रधान, अस्वस्थ करणारी आणि प्रत्येक क्षणाला धडधड वाढवणारी आहे. भीमराव मुडे आणि त्यांच्या मेहनती टीमबरोबर काम करणं आणखी खास होतं. ही सीरीज नेहमीच्या हॉरर सीरीजसारखी नाही – ती रेंगाळते, कुजबुजते आणि तुमच्या आत दडून राहाते. आमच्या विश्वात पाऊल टाकल्यानंतर प्रेक्षक कसे प्रतिसाद देतात हे पाहाण्यासाठी मी उत्सुक आहे.’

Web Title: Andhar maya trailer launch zee5 first marathi horror series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 05:26 PM

Topics:  

  • marathi cinema

संबंधित बातम्या

विरोधानंतर ‘मना’चे श्लोक आता नवीन नावासह प्रदर्शनासाठी सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
1

विरोधानंतर ‘मना’चे श्लोक आता नवीन नावासह प्रदर्शनासाठी सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘आईला वाचवा…’ पुणे-सातारा प्रवासादरम्यान प्रियदर्शिनीचा अपघात, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
2

‘आईला वाचवा…’ पुणे-सातारा प्रवासादरम्यान प्रियदर्शिनीचा अपघात, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शिवरायांचा अनोखा प्रवास, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
3

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शिवरायांचा अनोखा प्रवास, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अखेर ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाला कोर्टाकडून हिरवा कंदील, आजपासून चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित
4

अखेर ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाला कोर्टाकडून हिरवा कंदील, आजपासून चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ajit Pawar: “वंचित आदिवासी, गरीब समाजाला…”; अजित पवारांचे ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Ajit Pawar: “वंचित आदिवासी, गरीब समाजाला…”; अजित पवारांचे ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

म्हणूनच Maruti Suzuki देशाची नंबर 1 ऑटो कंपनी! Maruti Victoris ने पहिल्याच महिन्यात मिळवली हजारो बुकिंग्स

म्हणूनच Maruti Suzuki देशाची नंबर 1 ऑटो कंपनी! Maruti Victoris ने पहिल्याच महिन्यात मिळवली हजारो बुकिंग्स

गडचिरोलीत माओवाद पूर्णपणे संपुष्टात येण्याचा मार्ग तयार; ६१ माओवाद्यांचे सशस्र आत्मसमर्पण

गडचिरोलीत माओवाद पूर्णपणे संपुष्टात येण्याचा मार्ग तयार; ६१ माओवाद्यांचे सशस्र आत्मसमर्पण

सप्टेंबरमध्ये बेरोजगारी वाढली! भारताचा दर 5.2 टक्क्यांवर, ग्रामीण भागात संकट तीव्र

सप्टेंबरमध्ये बेरोजगारी वाढली! भारताचा दर 5.2 टक्क्यांवर, ग्रामीण भागात संकट तीव्र

सोलापूर ते मुंबई विमानसेवेच्या शुभारंभाने जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्गघाटन

सोलापूर ते मुंबई विमानसेवेच्या शुभारंभाने जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्गघाटन

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी’; समितीकडून CM Relief Fund ला 1 कोटींची मदत

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी’; समितीकडून CM Relief Fund ला 1 कोटींची मदत

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य;  अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य; अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.