Paresh rawal reveal that hera pheri 3 director priyadarshan tried to convince him
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी अलीकडेच बहुप्रतिक्षित ‘हेरा फेरी 3’ चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकांशिवाय चाहत्यांनाही धक्का बसला आहे. चित्रपटातून बाहेर पडण्याच्या ह्या निर्णयाने खरंतर, सोशल मीडियावर खळबळ उडाली. अभिनेत्याने अद्यापही ‘हेरा फेरी 3’ चित्रपट सोडण्यामागील कारण स्पष्ट केलेलं नाही. आता या प्रकरणावर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी टिव्ही ९ भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा मला परेश रावल ‘हेरा फेरी ३’ चित्रपटातून बाहेर पडत असल्याचं कळलं तेव्हा मी ‘भूत बंगला’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये होतो. परेश रावल यांनी मला चित्रपट सोडून जाण्यामागचं अजूनही कारण सांगितलेलं नाही. त्यांनी हा निर्णय का घेतला हे मलाही माहित नाही. शिवाय, ते माझ्यासोबत बोलतही नाहीयेत. ते जर माझ्याशी नीट बोलले तरच मला त्यांचं कारण कळेल ना. माझ्यामुळे त्यांना काहीही प्रॉब्लेम नाहीए, पण तरी त्यांनी चित्रपटातून बाहेर पडण्या मागचं कारण अद्याप सांगितलेलं नाही.”
कुटुंबाचं घर की पछाडलेला वाडा? ZEE5 ची पहिली हॉरर वेबसीरीज ‘अंधार माया’ चा ट्रेलर लाँच
परेश रावल यांनी या चित्रपटासंबंधित Legal Contract साईन केलं होतं, परंतु तरीही त्यानंतर त्यांनी चित्रपट नाकारला. हा चित्रपट अक्षय कुमारच्या मालकीचं असलेल्या केप ऑफ गुड फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली चित्रपट बनवला जाणार आहे. ज्यामुळे अक्षय कुमारने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या कायदेशीर नोटीसमध्ये अभिनेत्याच्या अव्यावसायिक वर्तनामुळे (Unprofessional Behaviour) झालेल्या नुकसानासाठी २५ कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. मात्र, याप्रकरणी परेश रावल यांचे अद्याप कोणतेही विधान समोर आलेले नाही.