दीपिका आणि रणवीरमध्ये खूप छान बॉन्डींग असल्याचं आपल्याला नेहमीच पहायला मिळतं. अलीकडेच दीपिकाने रणवीर सिंगला टॅग करत सोशल मीडियावर एक मीम शेअर केलं आहे. या मीममधून दीपिकाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील मजेशीर गोष्ट या मीममधून शेअर केली आहे. (deepika padukon,ranveer singh)

दीपिकाला निसर्ग आणि त्यासंबंधीत सगळ्याच गोष्टी खूप प्रिय वाटतात. त्यामुळे, तिच्या घरातही खूप झाडं आहेत. म्हणून ती कुठेही गेली तरी तिला झाडं,रोपं खरेदी करायला खूप आवडतात. यावरच, आधारित एक मीम तिने शेअर केले आहे. यामध्ये, एक जोडपे त्यांच्या घरासाठी रोपे खरेदी करण्यासाठी गेलेले दिसतायत. यातील प्रेयसीच्या घरी आधीच भरपूर रोपे आहेत. यानंतरही तिला नवीन रोपे घ्यायची आहेत. मात्र तिचा प्रियकर तिला ही रोपे घेण्यापासून रोखत असल्याचं दिसतयं. या मीमच्या माध्यमातून दीपिकाने रणवीरसोबत झाडांवरून झालेल्या भांडणाची गंमत सांगिण्याचा प्रयत्न केला आहे.

रणवीरसमोर कमीपणा दाखवायला लाज वाटली नाही : दीपिका
दीपिका पदुकोणने टाईम मॅगझिनसोबत बोलताना रणवीर सिंगसोबतचे नाते आणि कारकीर्द यावर दिलखुलास संवाद साधला. त्यांच्या नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रणवीरसमोर तिचा कमकुवतपणा उघड करण्यात तिला अजिबात संकोच वाटत नाही. तर, संयम या गोष्टीवर मी अजूनही प्रयत्न करत आहे.

आजकाल जोडप्यांमध्ये संयमाचा अभाव आहे: दीपिका
दीपिका पुढे म्हणाली- जितक्या लवकर तुम्हाला समजेल की, सर्व काही चित्रपटांमध्ये दाखवले जाते किंवा जसा तुम्ही विचार करता तसं कोणाच्याही बाबतीत होत नसतं. वास्तविक जीवन चित्रपटांपेक्षा खूप वेगळे आहे. आजच्या तरुण जोडप्यांमध्ये संयमाची फार कमतरता जाणवत असल्याचं दीपिकाचं म्हणणं आहे.
दीपवीर कोणत्या आगामी चित्रपटात झळकणार-
लवकरच दीपिका पदुकोण हृतिक रोशनसोबत फायटर या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय दीपिका नाग अश्विनच्या प्रोजेक्ट के या चित्रपटात प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. त्याचवेळी रणवीर सिंग लवकरच रॉकी और रानी की प्रेमकथामध्ये आलिया भट्टसोबत दिसणार आहे.






