Diwali 2026: बाजारात विविध आकारांतील स्टिकर रांगोळी, लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स आणि तोरणांचे स्टिकर्स उपलब्ध आहेत. याशिवाय नक्षीदार छाप रांगोळीसाठी चाळण्याही मिळत आहेत. साधारण १० ते ५० रुपयांपर्यंत या चाळण्यांचे दर आहेत.
दिवाळी 2026 (फोटो- सोशल मिडिया)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
दिवाळीत वुडन, वुलन आणि मॅट रांगोळीला महिलांची पसंती
फ्लॅट संस्कृतीत स्टिकर व आर्टिफिशियल रांगोळीचे आकर्षण
नव्या डिझाईन्सना बाजारात मागणी
Pune/Diwali 2026: दिवाळी म्हटले की घरासमोर आकर्षक रांगोळी आणि त्याभोवती सजवलेल्या पणत्या, हे चित्र हमखास पाहायला मिळते. मात्र, बदलत्या जीवनशैलीबरोबर रांगोळीचे स्वरूपही बदलत आहे. पारंपरिक (Pune) रंगांच्या रांगोळीबरोबरच आता बाजारात वुडन, वुलन, मॅट आणि आर्टिफिशियल रांगोळीचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेषतः फ्लॅट संस्कृतीत कमी जागा आणि वेळेची मर्यादा लक्षात घेता महिलांकडून या पर्यायांना पसंती दिली जात आहे.
वुडन रांगोळीचा वेगळा अंदाज
लाकडापासून तयार केलेल्या नक्षीदार साच्यांमध्ये रंग भरून बनवलेली वुडन रांगोळी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ही रांगोळी जमिनीवर काढण्याची किंवा चिकटवण्याची गरज नसते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येत असल्याने ती घराच्या प्रवेशद्वारासह विविध ठिकाणी ठेवता येते. गोल, चौकोनी अशा वेगवेगळ्या आकारांत ती उपलब्ध आहे.
रांगोळी काढण्याची कला अवगत नसलेल्या महिलांसाठी मॅट रांगोळी उपयुक्त ठरत आहे. सुट्या भागांमध्ये मिळणाऱ्या या रांगोळीची पॅकिंगवरील नमुन्यानुसार मांडणी करता येते. विशेष म्हणजे ती पुन्हा वापरता येते. त्यामुळे सणाच्या काळात स्वच्छता आणि सजावटीची कामे सांभाळताना महिलांचा वेळ वाचतो.
वुलन रांगोळीने वेधले लक्ष
लोकरीच्या आणि रेशमी धाग्यांपासून तयार केलेली वुलन रांगोळीही यंदा विशेष आकर्षण ठरत आहे. विविध फुलांच्या आकारांतील आणि फ्लोरोसंट रंगांतील डिझाईन्समुळे घराला आकर्षक लूक मिळतो. ही रांगोळी धुता येत असल्याने पुन्हा वापरणे शक्य आहे. घराचे कोपरे, पायऱ्या आणि भिंतींच्या कडेला तिची सजावट करता येते.
बाजारात विविध आकारांतील स्टिकर रांगोळी, लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स आणि तोरणांचे स्टिकर्स उपलब्ध आहेत. याशिवाय नक्षीदार छाप रांगोळीसाठी चाळण्याही मिळत आहेत. साधारण १० ते ५० रुपयांपर्यंत या चाळण्यांचे दर आहेत. कमी वेळेत आकर्षक सजावट करण्यासाठी महिलांकडून या पर्यायांचा वापर केला जात आहे.
दिवाळीमध्ये या रांगोळ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी कमी वेळेत घराची आकर्षक सजावट करण्याचा हा उत्तम पर्याय आहे. तसेच, घरी राहणाऱ्या महिलांनाही अशा प्रकारच्या रांगोळ्या तयार करून विक्री करण्याची संधी आहे. यातून त्या घरबसल्या छोटा व्यवसाय सुरू करून आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात.
– शिवानी पठारे, वुलन रांगोळी तयार करणारी महिला
💡
Frequently Asked Questions
Que: दिवाळीनिमित बाजारात कोणत्या गोष्टींना मागणी वाढली आहे?
Ans: बाजारात विविध आकारांतील स्टिकर रांगोळी, लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स आणि तोरणांचे स्टिकर्स यांना मागणी वाढली आहे.
Que: दिवाळीत कोणत्या रांगोळ्यांना मागणी वाढली आहे?
Ans: दिवाळीत स्टिकर रांगोळी, वुलन रांगोळीची मागणी वाढली आहे.
Web Title: Pune market people womens demand to new rangoli woolen mat diwali 2026 tb