(फोटो सौजन्य-AI एआय)
भारतीय दुचाकी मार्केटमध्ये सुझुकी मोटरसायकल इंडियाने ऑक्टोबर 2026 मध्ये विक्रीचा नवा विक्रम नोंदवला आहे. सणासुदीच्या काळात कंपनीने देशांतर्गत विक्रीत आतापर्यंतची सर्वोच्च मासिक आकडेवारी गाठली. कंपनीची एकूण विक्री 1.46 लाख युनिट्सवर पोहोचली असून मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील 1.29 लाख युनिट्सच्या तुलनेत 13% वाढ झाली आहे. पण भारतातून होणाऱ्या दुचाकी एक्स्पोर्टमध्ये घट दिसून आली.
ऑक्टोबर 2026 मध्ये सुझुकीने भारतात 1,24,599 दुचाकी विकल्या. ऑक्टोबर 2025 मध्ये हा आकडा 1,03,454 युनिट्स होता. म्हणजेच देशांतर्गत विक्रीत 20% वाढ झाली. या विक्रीच्या जोरावर सुझुकी भारतीय दुचाकी कंपन्यांमध्ये पाचव्या स्थानावर राहिली. हिरो, होंडा, टीव्हीएस आणि बजाज या कंपन्या तिच्या पुढे आहेत.
सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
सुझुकीच्या भारतात तयार झालेल्या दुचाकींच्या एक्स्पोर्टमध्ये ऑक्टोबर महिन्यात घट झाली. कंपनीने 21,720 युनिट्स परदेशात पाठवल्या. ऑक्टोबर 2025 मध्ये 25,807 युनिट्सची निर्यात झाली होती. त्यामुळे एक्स्पोर्टमध्ये 16% घट नोंदवली गेली. दुसरीकडे, स्पेअर पार्ट्स व्यवसायाने 118.8 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. मागच्या वर्षी याच महिन्यात 85.7 कोटी रुपये महसूल होता. या व्यवसायात 39% वाढ झाली.
ऑक्टोबरमध्ये सुझुकीने व्ही-स्ट्रॉम एसएक्ससाठी ग्लास स्पार्कल ब्लॅक आणि मेटॅलिक मॅट फायब्रोइन ग्रे असे ड्युअल-टोन कलर ऑप्शन सादर केले. व्ही-स्ट्रॉम एक्स्पेडिशन 2026 या राइडमध्ये 43 सुझुकी कस्टमर सहभागी झाले. दिल्लीपासून झंस्कार आणि लडाखमार्गे चंदीगडपर्यंत 2,535 किलोमीटरचा प्रवास करण्यात आला.
याशिवाय, बर्गमन हँगआउट परेड 11 शहरांमध्ये आयोजित करण्यात आली. पालक्काड आणि कोल्हापूर येथे जिक्सर पिटस्टॉप उपक्रमातून राइडर्सना टेस्ट राइडची संधी मिळाली. सप्टेंबर 2026 मध्ये सुझुकी हायाबुसा स्पेशल एडिशन 19.90 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) किंमतीत लाँच झाली होती. पर्ल व्हिगर ब्लू रंगासह खास डेकल्स, व्हील फिनिश आणि फ्युल टँकवरील स्पेशल एडिशन बॅज हे तिचे वैशिष्ट्य आहे. सुझुकीच्या विक्रीतील या वाढीमुळे भारतातील कस्टमर कनेक्शन आणि सणासुदीच्या मागणीचा कंपनीला फायदा झाल्याचे दिसते.
Ans: सुझुकीने ऑक्टोबर 2026 मध्ये एकूण 1,46,319 दुचाकींची विक्री केली. यात देशांतर्गत विक्री आणि एक्स्पोर्टचा समावेश आहे.
Ans: ऑक्टोबर 2026 मध्ये सुझुकीची भारतातील विक्री 1,24,599 युनिट्स झाली. ऑक्टोबर 2025 च्या तुलनेत यात 20% वाढ झाली.
Ans: सुझुकी हायाबुसा स्पेशल एडिशनची एक्स-शोरूम दिल्ली किंमत 19.90 लाख रुपये आहे. ही बाईक सप्टेंबर 2026 मध्ये लाँच झाली होती.






