ब्रीच कँडी रुग्णालयात प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीला
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना सुरुवात झाली आहे. (Prafull Patel meets Sharad Pawar)
शरद पवार यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी (5 नोव्हेंबर) प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, या भेटीची चर्चा केवळ प्रकृतीपुरती मर्यादित राहिली नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत विचारणा केली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणते विषय मांडण्यात आले, याची माहिती त्यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, 2 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील सहा प्रमुख नेत्यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होता.
या बैठकीनंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडी आणि दोन्ही गटांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली होती.
शरद पवारांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, साहेबांची तब्येत चांगली आहे. ते हसत होते आणि राज्यासह देशात काय सुरू आहे, याची विचारपूस करत होते.
आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी वैयक्तिक प्रेम आणि पारिवारिक संबंध कायम आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. रुग्णालयात इतर राजकीय चर्चा करणं योग्य नसल्याचं सांगत त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या आधी मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती.
आता या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील राजकीय संवादाबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या भेटीत नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
Ans: गुरुवारी, 5 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली.
Ans: सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत विचारणा केली. मात्र, या चर्चेचा अधिकृत तपशील समोर आलेला नाही.
Ans: शरद पवार यांची तब्येत चांगली असून ते हसत होते आणि राजकीय घडामोडींची विचारपूस करत होते, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. रुग्णालयातील डॉक्टरांनीही त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.






