लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर
तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. सध्याच्या काळात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. रोज नवीन शोध आणि नवीन आविष्कार होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI), मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन सारख्या तंत्रज्ञानामुळे माणसांची कामं अतिशय सोपी झाली आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने कामं करण्याचा वेग देखील वाढला आहे. पूर्वी ज्या कामासाठी अनेक तास लागत होते आज तीच कामं काही क्षणात केली जात आहेत.
बदलतं तंंत्रज्ञान जितकं फायदेशीर आहे तितकंच ते धोकादायक देखील आहे. कारण या बदलत्या तंत्रज्ञानामुळे लाखो लोकांची नोकरी धोक्यात येऊ शकतात. AI ला जेव्हा याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने असं उत्तर दिलं आहे, जे वाचून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
AI ने गेल्या काही वर्षात मोठी झेप घेतली आहे. यापूर्वी ज्याप्रमाणे मोबाईलचा वापर केला जात होते, त्याचप्रमाणे आता AI चा वापर केला जात आहे. सध्याच्या काळात चॅटबॉट्स,व्हॉईस असिस्टेंट्स आणि AI आधारित टूल्स कंपन्यांमध्ये ग्राहक सेवापासून डेटा एनालिसिसपर्यंत अनेक काम करत आहेत. बँकिंग, हेल्थकेयर आणि एजुकेशन सेक्टर मध्ये AI चा वापर वाढल्या असल्याने पारंपारिक नोकऱ्यांवर मोठं संकट येऊ शकतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2030 पर्यंत, लाखो नोकऱ्या पूर्णपणे एआय-आधारित प्रणालींद्वारे हाताळल्या जाऊ शकतात.
फॅक्ट्रि आणि इंडस्ट्रियल सेक्टर्समध्ये आधीपासूनच रोबोटिक मशीन माणसांचं काम करत आहे. कार मॅन्युफॅक्चरिंगपासून पॅकेजिंगपर्यंत सर्वच ठिराणी रोबोट्सचा वापर केला जात आहे. ऑटोमेशनमुळे प्रोडक्टिविटी वाढत आहे आणि कंपन्यांचा खर्च कमी होत आहे. म्हणूनच येत्या काळात मानवांची जागा घेण्यासाठी रोबोटचा वापर झपाट्याने वाढेल.
2030 पर्यंत मेडिकल सेक्टरमध्ये देखील टेक्नोलॉजीमुळे मोठा बदल होण्याची शक्यता आहे. रोबोटिक सर्जरी, AI आधारित डायग्नोसिस आणि ऑटोमेटेड फार्मेसी सिस्टम डॉक्टर्स आणि परिचारिका यांच्यावरील भार कमी होणार आहे. मात्र यामुळे हेल्थकेयर क्षेत्रातील लाखो लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात. पण त्याच वेळी, नवीन तांत्रिक कौशल्ये असलेल्या लोकांची मागणी देखील वाढेल.
ऑटोमॅटिक आणि सेल्फ-ड्राइविंग वाहनांचा वेगाने विकास होत आहे. कंपन्या असे कार आणि ट्रक डिझाईन करत आहेत, ज्यांना चालवण्यासाठी माणसांची गरज नाही. जर हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर लागू केले तर त्याचा थेट परिणाम टॅक्सी, ट्रक आणि बस चालकांच्या नोकऱ्यांवर होईल.
ऑनलाइन शॉपिंगसह ऑटोमेटेड कॅश काउंटर आणि वर्चुअल असिस्टेंट्स आधीच रिटेल इंडस्ट्रीमध्ये बदल करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात सुपरमार्केट्स आणि मॉल्समध्ये कॅशियर्सच्या जागी मशीन्स असू शकतात. यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.