मुंबई– बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. सुष्मितानेच दिलेल्या माहितीनुसार तिला नुकताच हार्ट अटॅक (Heart Attack) आला, त्यानंतर तिनं एन्जिओप्लास्टी (Angioplasty) केली. सुष्मितानं सोशल मीडियाच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोराही दिलाय.
सुष्मितानं लिहिलंय, आता सगळं ठीक आहे
सुष्मिताने याबाबत आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, जेव्हा आपल्याला ह्रद्याची सर्वाधिक गरज आहे, त्यावेळी त्याला आनंदी आणि साहसी ठेवा. तरच ते तुमच्यासोबत उभं राहिलं. वडील सुबीर सेन यांचं वाक्य पुढे तिनं लिहिलंय- काही दिवसांपूर्वी मला हार्ट अटॅक आला होता. आधी एन्जिओप्लास्टी करण्यात आली. आता ह्रद्यात स्टेन्ट टाकण्यात आलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कार्डिओोलॉजिस्टनं सांगितलं आहे की, माझं ह्रद्य विशाल आहे. वेळेवर केलेल्या मदतीसाठी आणि आवश्यक कृतीसाठी अनेकांचे आभार मी व्यक्त करायला हवेत. ते मी इतर कोणत्या तरी पोस्टमध्ये करीन. ही पोस्ट केवळ तुम्हा सर्वांना ( हितचिंतक आणि निकटवर्तीयांना) ही चांगली बातमी देण्यासाठी आहे की, सगळं काही व्यवस्थित आहे, आणि मी पुन्हा एकदा काही जीवन जगण्यासाठी तयार आहे. माझं तुमच्या सगळ्यांवर प्रेम आहे. देव महान आहे. डुग्गाडुग्गा.
चाहत्यांची चिंता वाढली, अनेकांनी मागितली दुवा
सुष्मिताच्या या पोस्टनंतर तिचे चाहते आणि जवळच्या असणाऱ्यांची तिच्या चांगल्या प्रकृतीसाठी देवाला प्रार्थना केली आहे. एका युझरनं लिहिलंय की, तुझी पोस्ट वाचून अंगावर काटा उभा राहिला. डोळ्यातून अश्रू ओघळले. प्लीज स्वत:ची काळजी घे. संपूर्ण जगातील लोकांना तू आवडतेस. तुला सगळे पाहत असतात.
29 व्या वर्षांपासून मॉडेलिंग आणि चित्रपटांत
19 नोव्हेंबर 1975 साली हैदराबादमध्ये जन्मलेल्या सुष्मिता 1994 पासून मॉडेलिंग आणि सिनेजगतात एक्टिव्ह आहे. 1994 साली पहिल्यांदा मिस इंडिया युनिव्हर्स म्हणून तिची निवड झाली, नंतर ती पहिली मिस युनिव्हर्स ठरली. 1996 साली सिनेमा दस्तकमधून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंर अनेक चित्रपटांतून तिन स्वत:चं स्थान निर्माण केलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आर्या या वेब सीरिजमध्ये तिनं लिड रोल केला आहे. या सीरिजचे आणखी दोन पार्ट येणार असून, लवकरच ते वेबकास्ट होतील.






