Gadar 2 box office collection : सनी देओलच्या (Sunny Deol) तारा सिंगने धडाक्यात पुनरागमन केलं. पुन्हा एकदा थिएटरबाहेर (theatre) गर्दी पाहायला मिळाली. 22 वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या या आयकॉनिक हिरोने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर (Box office collection) राज्य करण्यास सुरुवात केली आहे. 2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘गदर’चा सिक्वेल तब्बल 22 वर्षांनी आला आहे. गदर 2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालेल असं साऱ्यांनाच वाटत होतं, पण इतकी दणक्यात कमाई करेल असं वाटलं नव्हतं.
शुक्रवारी रिलीज झालेल्या गदर 2 ला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. अनेक सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये तारा सिंगच्या पुनरागमनामुळे, ‘हाऊसफुल’चे बोर्डही बऱ्याच काळानंतर झळकले. दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांचे मल्टिप्लेक्स असो किंवा छोट्या शहरातील सिंगल स्क्रीन थिएटर्स असो. शुक्रवारी ‘गदर 2’ने सर्वत्र धुमाकूळ घातला. अहवालानुसार ‘गदर 2’ ने पहिल्याच दिवशी या वर्षातील दुसरे सर्वात मोठे ओपनिंग कलेक्शन केले आहे.
‘गदर 2’चे ओपनिंग कलेक्शन
पहिल्याच दिवशी ‘गदर 2’चे Advanced बुकींग जबरदस्त होते. देशभरात’गदर 2’ चे Advanced booking जवळपास 2 लाख 80 हजाराहून अधिक झाले आहे. तर जगभरात सुमारे 7 लाखांहून अधिक Advanced booking झाले आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 30 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ट्रेड रिपोर्ट्समधील अंदाजानुसार ‘गदर 2’ ने पहिल्या दिवशी 38 ते 40 कोटी रुपये कमावले आहेत.
पहिल्या दिवशीच केला विक्रम
सनी देओलच्या (Sunny Deol) या सिनेमाने’पठाण’ (Pathan movie) नंतर 2023 ची सर्वात मोठी ओपनिंग केलं आहे. शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 57 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 36 कोटींची कमाई करून प्रभासचा ‘आदिपुरुष’ ‘पठाण’नंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, ‘गदर 2’ आदिपुरुष सिनेमाला मागे टाकले आहे.
बॉलिवूड सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सनीचा हा सिनेमा सर्वात मोठा ओपनिंग कलेक्शन करणारा सिनेमा ठरला आहे. आमिर खानच्या ‘धूम 3’ (2013) ने पहिल्या दिवशी 36.22 कोटी रुपयांची कमाई केली आणि कोणत्याही सीक्वलची ही सर्वात मोठी ओपनिंग होती. ‘गदर 2’ ने 10 वर्षांनंतर हा विक्रम केला आहे. भारतीय सिनेमांबद्दल बोलायचे झाल्यास, ‘KGF 2’ हा 57 कोटींच्या ओपनिंग कलेक्शनसह सर्वात मोठा ओपनिंग सिक्वेल होता. ‘बाहुबली 2’ने पहिल्या दिवशी 41 कोटींची कमाई केली. यानंतर ‘गदर 2’ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
‘गदर 2’ने सनीला तिच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग दिली आहे. पहिल्याच दिवशी, सिनेमाचे कलेक्शन 40 कोटींच्या जवळ पोहोचले आहे, ज्यामुळे ‘गदर 2’ वीकेंडलाच 100 कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता आहे.