पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लूएंसरचा Private Video लीक, इंटरनेट विश्वात खळबळ
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लूएंसर इम्शा रेहमान चर्चेत आली आहे. इम्शा रेहमान टिकटॉकमुळे जगभरात चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर इम्शाचा एक प्रायव्हेट व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा तिचा प्रायव्हेट व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून तिला नेटकरी तुफान ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्यामुळे तिने सोशल मीडिया अकाऊंटही डिलीट केलं आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेली इम्शाच्या नेटवर्थचीही जोरदार चर्चा होत आहे.
‘स्त्री २’ च्या यशानंतर राजकुमार रावने खरंच मानधनात वाढ केली? अभिनेत्याने स्वतःच स्पष्ट केलं
मीडिया रिपोर्टनुसार, इम्शा रेहमानची एकूण संपत्ती चार कोटींच्या आसपास आहे. तर पाकिस्तानी चलनाप्रमाणे १४ कोटी रूपये इतके आहे. इम्शा मुळची लाहोरची असून ती पाकिस्तानातील प्रसिद्ध इन्फ्लूएंसरपैकी एक आहे. तिच्या व्हिडिओंची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. इम्शा एक प्रसिद्ध टिकटॉकर आहे. ती कायमच सोशल मीडियावर चाहत्यांना फिशिंग आणि लाईफस्टाईल संबंधित माहिती देत प्रसिद्ध झाली आहे. तिच्या सौंदर्याची आणि ग्लॅमरची अवघ्या जगभरात जोरदार चर्चा होते. सध्याच्या इंटरनेटच्या जगात इम्शा कमालीची लोकप्रिय असून तिचा स्वतःचा चाहतावर्ग फार मोठा आहे. इन्स्टाग्रामवर इम्शाचे १,११,००० तर टिकटॉकवर २००,००० फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियावरील लोकप्रियतेमुळे इम्शाला जाहिरात आणि ब्रँड प्रमोशनही मोठ्या प्रमाणावर मिळते. टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर इम्शा अनेकदा सौंदर्य, फॅशन आणि इतर अनेक प्रकारचे व्हिडिओ शेअर करते. तिच्या फॅन्सकडून तिच्यावर कायमच कौतुकाचा वर्षाव होतो. परंतु आता इम्शा रहमानने सोशल मीडियाकडेही पाठ फिरवली आहे. इम्शाने आपलं अकाऊंटही डिलीट केल्याचंही सांगितलं जात आहे. जो पर्यंत तिचा तो प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल होत राहिल तोपर्यंत तिचं अकाऊंट बंद राहणार असल्याची माहिती तिने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. टिकटॉक स्टार इम्शा रेहमानचा प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे तिला ट्रोल केलं गेलं होतं. व्हिडीओमध्ये इम्शा नको त्या अवस्थेत होती.
सात बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांवर नॉमिनेशनचे संकट? दोन स्पर्धकांचा होणार पत्ता कट
दरम्यान, इम्शाचा तो प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या अनेक फॅन्सने तिचा तो व्हिडिओ फेक असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी तिच्या त्या लिक व्हिडिओला पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे. काही पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार इन्फ्लूएंसर इम्शाचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याची माहिती आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्यामुळे तिने तिचे इन्स्टाग्राम आणि टिकटॉक अकाउंट डिलीट केले आहे. इम्शाचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीवर अद्याप पोलिसांकडून कारवाई करण्यात आली की नाही, याची माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेमुळे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, कारण काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी टिकटॉक मिनाहिल मलिकला तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.