फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस नॉमिनेशन 18 : बिग बॉसचा हा सीझन मनोरंजक होत चालला आहे. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, रजत दलाल आणि श्रुतिका अर्जुन यांच्यासह अनेक स्पर्धक आपले सर्वोत्तम देत आहेत, त्याचबरोबर या स्पर्धकांची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड होत आहे. अजुनपर्यत कोणता स्पर्धक विजयी होणार याचा नेम लावणं कठीण आहे. परंतु प्रत्येक आठवड्यात कोणीतरी बाहेर पडण्याचा धोका प्रत्येक स्पर्धकाच्या डोक्यात आहे. या आठवड्यात एक नाही तर दोन घरातले स्पर्धक बेदखल होणार असल्याची बातमी आहे. बिग बॉसने ज्या वेगाने वाइल्ड कार्ड खेळाडूंना शोमध्ये आणले आहे, त्यामुळे घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील लोकांची कमी झालेली संख्या पुन्हा वाढली आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार आता हा आकडा संतुलित करण्याची वेळ आली आहे.
बिग बॉस 18 संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
या आठवड्यामध्ये सात स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, सारा अरफिन खान, तिजेंदर बग्गा, कशिश कपूर आणि श्रुतिका अर्जुन हे स्पर्धकांवर नॉमिनेशनचे संकट आहे. नुकत्याच झालेल्या विकेंडच्या वॉरमध्ये एलिस कौशिकला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आता या आठवड्यामध्ये फार मनोरंजक नॉमिनेशन घेतले जाणार आहेत. यामध्ये आता मैत्रीची परीक्षा घेतली जाणार आहे. बिग बॉसने या आठवड्यामध्ये काही जोड्या तयार केल्या होत्या आणि यामध्ये बिग बॉसने दोघांमध्ये कोण नॉमिनेट होणार हे सदस्यांना ठरवायचे होते.
🚨 Nominated Contestants for this week
☆ Avinash Mishra
☆ Tajinder Bagga
☆ Sara Arfeen Khan
☆ Karan Veer Mehra
☆ Kashish Kapoor
☆ Vivian Dsena
☆ Shrutika ArjunComments – Who will EVICT?
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) November 24, 2024
शिल्पा शिरोडकर – विवियनदसेना
करणवीर मेहरा – ताजिंदर बग्गा
श्रुतिका अर्जुन – चुम दारंग
रजत दलाल – चाहत पांडे
ईशा सिंग – अविनाश मिश्रा
कशिश कपूर – सारा अर्फीन खान
आता बिग बॉसच्या घरातून आणखी दोन खेळाडू बाहेर काढले जाणार आहेत. यामध्ये ज्या स्पर्धकांवर घराबाहेर जाण्याचे संकट आहे ते स्पर्धक म्हणजेच तेजिंदर बग्गा, सारा अरफीन आणि कशिश कपूर हे या आठवड्यात नामांकित खेळाडूंमधून बाहेर जाऊ शकतात. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात आलेल्या खेळाडूंपैकी कोणत्याही स्पर्धकाला बाहेर बाहेर काढले जाऊ शकते असे बिग बॉसने स्पष्ट केले आहे. बिग बॉसच्या घरातून अचानक 2 खेळाडूंची हकालपट्टी केली जाईल जे शोमधील खेळाडूंमधील परस्पर समीकरण बिघडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले – बग्गा आणि अदितीला बाहेर फेकले पाहिजे. दुसऱ्याने टिप्पणी केली – कोण बाहेर पडते ते पाहूया, विवियनने जाऊ नये. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने कमेंट लिहिली – मला वाटते अदितीला अधिक संधी आहेत. एका व्यक्तीने लिहिले – शिल्पाला बाहेर काढा आणि तिला हाकलून द्या. लोकांनी अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. प्रत्येकाला आपल्या आवडत्या खेळाडूला शोमध्ये ठेवायचे असते. पण शोमधून कोण आऊट होणार या प्रश्नाचं उत्तर फक्त वीकेंड का वारमध्येच मिळेल किंवा बिग बॉस मिडवीक एव्हिक्शन करू शकतात.