हॉरर कॉमेडी 'स्त्री ३' केव्हा येणार? राजकुमार रावने केलेल्या खुलाशामुळे चाहत्यांमध्ये निराशा; नेमकं अभिनेता काय म्हणाला
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घातलाय. या हॉरर कॉमेडी चित्रपटाची क्रेझ फक्त देशातच नाही परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहे. अमर कौशिक दिग्दर्शित चित्रपटाने देशात ६०० कोटींची कमाई केली असून जगभरात ९०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. ‘स्त्री २’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईडे नवीन रेकॉर्ड्स केले. ‘स्त्री २’ चित्रपटानंतर कलाकारांच्या प्रसिद्धीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्या कलाकाराने आपल्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे.
ए. आर. रेहमानच्या समर्थनार्थ सायरा बानो यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यांचं नाव तुम्ही…”
श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी स्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवर १५ ऑगस्ट २०२४ रिलीज झाला. चित्रपट रिलीज होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ झाला आहे. तरीही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. ‘स्त्री २’च्या यशानंतर कलाकारांची प्रसिद्धी वाढली आहे. आता अभिनेता राजकुमार रावने मानधनात वाढ केल्याचं बोललं जात आहे. त्याच्या प्रसिद्धीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. शिवाय त्याचे सोशल मीडियावरील फॉलोवर्समध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. फी वाढवण्याच्या चर्चांवर राजकुमार रावने नुकतेच मुलाखतीत भाष्य केले आहे.
निकालानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंवर केली सडकून टीका
‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार राव म्हणाला की, “मी दररोज माझ्या फीचे वेगवेगळे आकडे वाचतोय. सिनेनिर्मात्यांवर बोझा टाकण्याइतका मी मूर्ख नाही. माझ्या आवडीचं काम करण्याचं पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा मी भाग झाल्यानंतर एक अभिनेता म्हणून माझ्यात बदल होणार नाही किंवा झालेलाही नाही. मला माझं आयुष्यभर काम करायचे आहे, म्हणून मी अशी भूमिका शोधतोय ज्याने मी प्रेक्षकांना आश्चर्यचकित करेल, उत्साहित करेल, मला आव्हान देतील आणि माझा विकास होण्यास मदत करतील.” ‘स्त्री 2’ चित्रपटासाठी राजकुमार रावने ६ कोटी रुपये तर श्रद्धा कपूरने ५ कोटी रुपये फी म्हणून घेतली आहे. अभिनेत्याने एका पॉडकास्टमध्ये सांगितले होते की, लोक त्याच्याबद्दल जेवढे समजतात तेवढे तो श्रीमंत नाही.
विशाखा सुभेदारच्या पतीचं अभिनयविश्वात पुनरागमन! अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा
‘स्त्री २’ चित्रपटाने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या नावावर एक विक्रम रचला होता. ‘स्त्री २’ने ‘जवान’ला मागे टाकलं आहे. चित्रपटाने देशभरात ५९३.३० कोटींची कमाई केलेली आहे. तर जगभरात चित्रटाने ८१० कोटींची कमाई केलेली आहे. ‘जवान’ चित्रपटाने हिंदी भाषेत एकूण ५८२ कोटींची कमाई केलेली आहे, ‘जवान’नंतर ‘स्त्री २’ने बॉक्स ऑफिसवर हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई केलेली आहे. दरम्यान, चित्रपटाचा बजेट ५० कोटींच्या आसपासचा होता. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिकने केले असून श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत. तर, वरुण धवन, अक्षय कुमार आणि तमन्ना भाटियाने चित्रपटामध्ये कॅमियो रोल साकारला आहे.