दिल्ली : सुकेश चंद्रशेखर आर्थिक घोटाळा प्रकरणात (Money Laundering Case) अनेक अभिनेत्री गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनंतर आता नोरा फतेहीला (Nora Fatehi) नोटीस बजावली आहे. नोरा आज दिल्लीत चौकशीसाठी (Nora Fatehi Questioning In Money Laundering Case) हजर झाली आहे. सुकेश चंद्रशेखर आर्थिक घोटाळा प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीची आज दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली.
Delhi Police questions again Nora Fatehi in money laundering case involving conman Sukesh Chandrashekhar
Read @ANI Story | https://t.co/R32T2sj8ah#DelhiPolice #NoraFatehi #MoneyLaundering pic.twitter.com/Di15ybALlU
— ANI Digital (@ani_digital) September 3, 2022
[read_also content=”आता माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी करणार ‘ही’ नोकरी! https://www.navarashtra.com/sports/now-former-cricketer-vinod-kambli-will-do-this-job-321987/”]
नोराला चौकशीसाठी दिल्लीच्या ईडी कार्यालयात तिहारमधील सुकेश रंजन प्रकरणात बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसलाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. उद्या अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसलाही चौकशीसाठी हजर होण्याची शक्यता आहे. जॅकलीनलाही सुकेश रंजनकडून फसवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळेच तिला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.