Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चा धमाल टिझर रिलीज; चित्रपटात दिसणार मराठी इंडस्ट्रीतील तगडी स्टारकास्ट

'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या मराठी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खऱ्या अर्थाने चित्रपटाची तोंडओळख करून देणाऱ्या टिझरमध्ये 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी'मध्ये काय पाहायला मिळणार याची झलक दिसते.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 11, 2025 | 11:51 AM
‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चा धमाल टिझर रिलीज; चित्रपटात दिसणार मराठी इंडस्ट्रीतील तगडी स्टारकास्ट
Follow Us
Close
Follow Us:

मागील बऱ्याच दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती तो ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या मराठी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खऱ्या अर्थाने चित्रपटाची तोंडओळख करून देणाऱ्या टिझरमध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’मध्ये काय पाहायला मिळणार याची झलक दिसते. प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या टिझरमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’च्या टिझरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. ११ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सर्वसामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेली पूनम पांडे, ‘या’ कारणामुळे अडल्ट क्षेत्राकडे वळाली

फटमार फिल्म्सच्या सहयोगाने हेमंत चव्हाण, प्रद्योत पेंढरकर आणि निखिल मगर यांच्या सिक्स पर्पल हार्टसची प्रस्तुती असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या आगामी चित्रपटाची निर्मिती नेहा गुप्ता आणि प्रसाद नामजोशी यांनी केली आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते विजय नारायण गवंडे आणि श्रीकांत देसाई आहेत. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट या माध्यमाची उत्तम जाण असणाऱ्या या दिग्दर्शक द्वयींनी पुन्हा एकदा एक वेगळा आणि अनोखा विषय प्रेक्षकांसमोर आणला आहे. या चित्रपटाचे शीर्षक उत्सुकता निर्माण करणारे असून, प्रदर्शित झालेल्या टिझरने त्यात आणखी भर टाकण्याचे काम केले आहे.

 

कोणतीही व्यक्तिरेखा अगदी सहजपणे साकारण्याची हातोटी असलेले अभिनेते गिरीश कुलकर्णी कॉलेजमध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा विभाग सुरू करतात असे टिझरच्या सुरुवातीला पाहायला मिळते. त्यावर सयाजी शिंदे यांची आश्चर्यकारक प्रतिक्रिया उमटते आणि इथूनच ‘पावटॉलॉजी’ म्हणजे नेमके काय याबाबतची चर्चा सुरू होते. धूम स्टाईलने चालवल्या जाणाऱ्या बाईक्स, त्यावर मारलेली विली, कॉलेजमधील धमाल-मस्ती, सुमधूर गीत-संगीत, डान्स, टशन असा एकच कल्ला करत उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा चित्रपट येणार असल्याची चाहूल देणारा हा टिझर आहे. या चित्रपटात राजकारण, शिक्षण व्यवस्था आणि समाजकारण याचा मेळ घालण्यात आल्याचेही टिझर पाहिल्यावर सहजपणे जाणवते. नाविन्यपूर्ण विषय, शिक्षणाचे महत्त्व सांगणारा आशय, सुरेख सादरीकरण, सुमधुर गीत-संगीत, आशयघन कथानक, दमदार अभिनय, दर्जेदार निर्मितीमुल्ये अशी या चित्रपटाची विविध वैशिष्ट्ये आहेत.

जितेंद्र जोशीने आणलं रितेश देशमुखसाठी खास पत्र, ऐकताच अभिनेता झाला भावुक

सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी या मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन तगड्या अभिनेत्यांसोबत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, अपूर्वा चौधरी, प्रगल्भा कोळेकर, कृतिका देव, हरीश थोरात, सुयश झुंजुरके, छाया कदम, विजय निकम, शिवराज वाळवेकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. कथा संतोष शिंत्रे यांनी लिहिली आहे, तर दिग्दर्शनासोबतच पटकथा, संवाद आणि गीतलेखनसुद्धा प्रसाद नामजोशी यांनीच केले आहे. या चित्रपटातील गीतांना सुमधुर संगीत देण्याचे काम संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी केले असून, ध्वनी आरेखन मंदार कमलापूरकर यांनी केले आहे.

बॉलिवूड किंग खानच्या मन्नतला लागली कोणाची नजर? बंगल्याच्या बांधकामावर केले आरोप, जाणून घ्या प्रकरण

सागर वंजारी यांनी दिग्दर्शनासोबतच कार्यकारी निर्माता आणि संकलन करत तिहेरी भूमिका बजावली आहे. निलेश गोरक्षे यांचे कल्पक कला दिग्दर्शन लक्ष वेधणारे असून, अमिन काझी यांचे व्हीएफएक्सही नावीन्यपूर्ण आहेत. छायांकन गिरीश जांभळीकर यांनी केले असून, वेशभूषा रश्मी रोडे यांनी, तर रंगभूषा श्रीकांत देसाई यांनी केली आहे. प्रशांत गाडे आणि सुमित कुलकर्णी यांनी निर्मितीव्यवस्था सांभाळली आहे.

Web Title: Institute of pavtology marathi movie teaser launch produced by fatman films dilip prabhavalkar sayaji shinde girish kulkarni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • marathi actor
  • marathi film
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर
1

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
2

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
3

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना
4

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.