Marathi Actor Riteish Deshmukh Emotional In Zee Chitra Gaurav 2025 Award Ceremony
दिवंगत राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे सुपुत्र म्हणून रितेश देशमुखची ओळख आहे. रितेश देशमुख मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक प्रसिद्ध अभिनेताही आहे. त्याशिवाय तो मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे.
गेल्या शनिवारी ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा झी मराठी चॅनलवर टेलिकास्ट झाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि अमेय वाघकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी होती. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रितेश देशमुखचा एक भावुक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेता जितेंद्र जोशी अभिनेता रितेश देशमुखसाठी एका खास व्यक्तीचं पत्र घेऊन आला. ती खास व्यक्ती म्हणजे त्याचे दिवंगत वडील आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं पत्र…
जितेंद्र जोशीने विलासरावांचं पत्र वाचल्यानंतर रितेश देशमुखला अश्रू अनावर झाले. याचा व्हिडीओ ‘राजश्री मराठी’च्या युट्यूब अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
विलासराव देशमुख यांचं पत्र वाचताना व्हिडीओमध्ये जितेंद्र जोशी म्हणतो,
“प्रिय रितेश,”
“सप्रेम नमस्कार, विनंती विशेष…”
“पत्रास कारण की, या पत्रास काहीही कारण नाही. बापाला मुलासोबत बोलायला केव्हापासून कारणाची गरज भासायला लागली. आमचा दांडगा जनसंपर्क तर तुम्हाला माहितीच आहे. त्यांच्यासोबत तुमचा पहिला वहिला मराठी सिनेमा पाहताना खूप भरुन आलं. तुमचा ‘माऊली’ पाहताना तर, अभिमान वाटला होता. तुमचं पहिलं दिग्दर्शन असलेलं ‘वेड’ अनुभवलं आणि खात्री पटली की, तुम्ही यापुढेही अशीच अनुभूती आम्हालाही आणि प्रेक्षकांनाही द्याल. ‘तुझे मेरी कसम’चा आमचा समज तुम्ही ‘वेड’मध्ये खरा ठरवाल, असं आम्हाला वाटलं होतं. पण नाही, तुम्हाला अजूनही सुनबाई पुरुन उरत आहेत. गंमत बाजूला, पण रितेश तुम्ही कितीही वयानं आणि कतृत्वानं कितीही मोठे झालात तरीही आम्हाला दिसतो तो, भावंडांसोबत बाभळगावच्या विहिरीत भोपळे लावून पोहोणारा, गुडघे फुटून सायकलची फेरी मारणारा, मातीमध्ये ढोपरं सोलवटून गोट्यांचा डाव जिंकणारा, क्रिकेटची बॅट खांद्यावर घेतलेला आमचा लहानगा चिमुरडा… पण, आता तुम्ही अवघ्या भारताचं दैवत, आमची प्रेरणा राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट घेऊन येताय. त्यादिवशी झालेल्या तुमच्या लूकटेस्टला मी तुम्हाला डोळे भरुन पाहिलं. तेव्हा आमचे तुम्हाला पाहून डोळे भरुन आले.” जितेंद्र जोशीने वाचलेलं वडिलांचं पत्र ऐकून रितेशचे डोळे पाणावले. तो भावुक झाला.
कोरियोग्राफर गणेश आचार्चची अभिनयात एन्ट्री, ‘पिंटू की पप्पी’ चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका