Poonam Pandey Birthday Know How She Enter In Adult Industry
Poonam Pandey Birthday: बॉलिवूडची काँट्रोव्हर्सी क्वीन अभिनेत्री पूनम पांडे हिचा आज (११ मार्च) वाढदिवस आहे. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेली पूनम पांडे आज आपला ३४ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. नेहमीच वादग्रस्त गोष्टी करणारी पूनम पांडे तिच्या विचित्र पब्लिसिटी स्टंटमुळे देखील प्रसिद्धी झोतात राहिलीये. पूनम पांडे आणि वाद हे समीकरण तसं काही नवीन नाही. गेल्या वर्षी स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवल्यामुळे पूनम पांडे हिला नेटकऱ्यांनी कमालीचं ट्रोल केलं होतं. सामान्य कुटुंबात जन्मलेली पूनम अडल्ट फिल्म्सकडे कशी वळाली, असा प्रश्न अनेकांना पडलेला. तिच्या ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया…
कायमच विचित्र कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या पूनम पांडेचा जन्म ११ मार्च १९९१ रोजी नवी दिल्लीत झाला. ती अतिशय साध्या कुटुंबातील आहे. तिने आपले शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले आहे. पूनमने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू १८ वर्षांची असताना केले आहे. २०११ मध्ये ‘कॅलेंडर गर्ल्स’ची मॉडेल म्हणून पूनमला मॉडेलिंग जगतात ओळख मिळाली. याशिवाय, ‘ग्लॅडरॅग्स’ २०१० च्या टॉप आठ स्पर्धकांमध्ये ती होती. मॉडेलिंगच्या काळात पूनमने अनेक फॅशन मॅगझिनसाठी शूट केले होते. पूनम पांडेच्या घरी आई- वडिल, तिला एक बहीण आणि भाऊ असा तिचा परिवार आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेली पूनम अडल्ट फिल्म्सकडे कशी वळाली ? या प्रश्नाचं उत्तर तिने स्वत: दिले आहे.
एका मुलाखतीत पूनमला हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना पूनम म्हणाली की, “जेव्हा मी इंडस्ट्रीत आले तेव्हा काही लोकांनी मला असे काहीतरी करायला सांगितले जे झटपट हिट होईल. त्यासाठी काहीतरी वादग्रस्त करण्याचा सल्ला त्यांनी मला दिला होता. फक्त त्या लोकांचे ऐकून मी हे करू लागले. मात्र, हळूहळू माझं डोकं ठिकाणावर आलं. वादातून मिळणारी प्रसिद्धी केवळ १५ मिनिटंच टिकते.” बरेचदा पूनम ‘बी ग्रेड’ व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पूनम तिच्या कामामुळे कमी आणि अडल्ट व्हिडिओ आणि आक्षेपार्ह विधानांमुळेच कमालीची चर्चेत राहिली आहे. अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगून इंडस्ट्रीत आलेली पूनमला बॉलिवूडमध्ये मात्र चांगल्या ऑफर्स मिळाल्या नाहीत.
कोरियोग्राफर गणेश आचार्चची अभिनयात एन्ट्री, ‘पिंटू की पप्पी’ चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका
पूनमने मॉडेलिंगद्वारेच पैसे कमावण्यास सुरुवात केली. हळूहळू सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोअर्स वाढू लागली. आता ती ‘बी ग्रेड’ व्हिडिओ बनवून पैसे कमवते. लॉकअप शो दरम्यान पूनम म्हणाली होती की, लोक काय म्हणतात याची तिला पर्वा नाही, तिला तिचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायला आवडतं. स्वतःला प्रसिद्धीझोतात आणण्यासाठी पूनमने एकदा सांगितले की, तिची वेबसाइट हॅक झाली आहे. ती म्हणाली की, मी माझ्या वेबसाइटवर माझे अश्लील फोटो अपलोड केलेले नाहीत तरीही ते दिसत आहेत. याचा फायदा असा झाला की मोठ्या संख्येने लोकांनी पूनमची साइट सर्च केली.