(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)
शाहरुख खानचा बंगला ‘मन्नत’ बॉलिवूडमध्ये खूप चर्चेत आहे. आता या बंगल्यावर परवानगीशिवाय त्याचा विस्तार करण्याची योजना आखल्याचा आरोप करण्यात आला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे आणि हा आरोप कोणी केला आहे. याचदरम्यान एक बातमी समोर आली होती की मन्नतच्या नूतनीकरणासाठी अभिनेता शाहरुख खान दुसऱ्या ठिकाणी आपल्या कुटुंबासह शिफ्ट झाले आहेत. तसेच आता अभिनेत्याच्या मन्नतला कोणाची नजर लागली आणि त्यावर आरोप करण्यात आले आहेत.
जितेंद्र जोशीने आणलं रितेश देशमुखसाठी खास पत्र, ऐकताच अभिनेता झाला भावुक
परवानगी मिळाल्यानंतरच कोणतेही बांधकाम करता येते
अभिनेता शाहरुख खान त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील बंगल्या मन्नतमध्ये काही बदल करण्याचा विचार करत होता. याआधीही त्याच्यासमोर एक समस्या निर्माण झाली आहे. बार अँड बेंचच्या अहवालानुसार, सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी अभिनेत्याविरुद्ध राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) कडे धाव घेतली आहे. यामध्ये संतोषने अभिनेता आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) वर कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) ची परवानगी न घेता बंगल्यात बदल केल्याचा आरोप केला आहे. अहवालात म्हटले आहे की शाहरुख खान सहा मजली बंगल्याचा विस्तार करण्याची आणि दोन मजले जोडण्याची योजना आखत आहे. यासोबतच, अभिनेत्यावर बंगल्याबाबत फसवणुकीचा आरोपही करण्यात आला आहे.
पुरावे सादर करण्यास सांगितले
अभिनेता शाहरुख खानचा बंगला मन्नतवर जे काही आरोप झाले आहेत. त्यासाठी एनजीटीने संतोषला पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. न्यायिक सदस्य दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, “जर प्रकल्प प्रस्तावक किंवा एमसीझेडएमएने वरील प्रक्रियेचे कोणतेही उल्लंघन केले असेल, तर अपीलकर्त्याने ते चार आठवड्यांच्या आत त्याच्या समर्थनार्थ पुराव्यांसह विशेषतः नमूद करावे, असे न केल्यास या न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल सध्याचे अपील दाखल करण्याच्या टप्प्यावरच फेटाळून लावण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही.” या प्रकरणाची पुढील सुनावणी एनजीटी २३ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
सर्वसामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेली पूनम पांडे, ‘या’ कारणामुळे अडल्ट क्षेत्राकडे वळाली
शाहरुख खान वर्कफ्रंट
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान त्याच्यासोबत दिसणार आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असणार आहे. ‘किंग’ हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये अनेक कलाकार काम करताना दिसणार आहेत.