‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’, ‘बिग बॉस मराठी’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी ही मूळची कर्जतची. नुकतंच जुईने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये तिने कर्जतमधील वैद्यकीय सुविधा, होणारे लोडशेडींग याबद्दल संताप व्यक्त केलाय. जुईने पोस्टमध्ये लिहलं की, एवढ्या वर्षात कर्जत मध्ये एक “चांगलं” हॉस्पिटल असु नये ??? प्रत्येक वेळी काही वैद्यकिय अडचण आली की माणसांना लोदिवली किंवा पनवेलला न्यायचं? का? बरं, हॉस्पिटल म्हटलं. कि किमान चौवीसतास विजेची गरज असते. तर त्या बद्दल तर न बोललेलच बरं. मी. कर्जतकर आहे आणि म्हणून मला माझ्या गावात या किमान गरजा पूर्ण झालेल्या हव्यात.
एक तास असा जात नाही जेव्हा इथे लाईट जात नाही. एरव्ही लोडशेडींग तर हक्काने असतच. मग काय तर पावसाळा. मग काय तर आज झाडं कापायची होती. अशी कारण देण्यात येतात. वाईट वाटतंय आज हे शेअर करताना. कारण आज मी “माझ्या” अत्यंत लाडक्या कर्जतबद्दल अशा प्रकारे लिहीतेय पण एक चांगलं हॉस्पिटल आणि चोवीसतास लाईट हे “माझं” स्वप्नं कधी पूर्ण होईल माहित नाही पण आमच्या कर्जतला एकदातरी याच खुप सुंदर आहे ते एक कर्जतकर”, असे जुईने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.






