Rohit Pawar : पुणे रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्या; रोहित पवारांची मागणी, सौजन्य : आयएएनएस
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे रिंग रोडला अजित पवार यांचे नाव देण्यात यावे, तसेच त्यांच्या निधनाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असताना रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या मागण्या मांडल्या. अमित शाह सोमवारी पुणे जिल्हा परिषद कार्यालयात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अजित पवार यांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील नेत्यांचे त्यांनी आभारही मानले.
मात्र, अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये मंत्रिपदाचा लाभ घेतलेल्या नेत्यांनी पुणे रिंग रोडला त्यांचे नाव देण्याची मागणी का करू नये, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या विकासात अजित पवार यांचे अमूल्य योगदान आहे.
त्यांनी दशकाहून अधिक काळ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले. असे असतानाही राज्यातील एखाद्या मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्याबाबत काही जणांची भूमिका काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अजित पवार यांच्या कार्याची दखल केवळ पुतळ्याच्या अनावरणापुरती मर्यादित ठेवू नये, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. पुणे रिंग रोडला अजित पवार यांचे नाव देण्याची घोषणा अमित शाह यांनी करावी. त्याचबरोबर अजित पवार यांच्या निधनाची सीबीआय चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक
या मागण्या मान्य न झाल्यास अजित पवार यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पुणे रिंग रोडला त्यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. अजित पवार यांचा मृत्यू अपघात होता की त्यामागे काही कटकारस्थान होते, याचे सत्य समोर आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘या’ तारखेला एकदिवसीय संप
Ans: पुणे रिंग रोडला अजित पवार यांचे नाव द्यावे आणि त्यांच्या निधनाची सीबीआय चौकशी करावी, अशा दोन प्रमुख मागण्या रोहित पवार यांनी केल्या आहेत.
Ans: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे त्यांनी या मागण्या केल्या आहेत.
Ans: अमित शाह पुणे जिल्हा परिषद कार्यालयात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.






