‘क्या है सचिन में? लप्पू सा तो सचिन है। झींगुर जैसा लड़का है। मुंह से बोलने उसे आता नहीं है।’ सीमा हैदरचा प्रियकर सचिनच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने एका मुलाखती दरम्यान केलेलं हे वक्तव सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं होत. यावर अनेक प्रकारचे मीम बनवले जाऊ लागले. आता त्याच शेजारणीच्या वक्तव्यावर रसोड़े में कौन था?’ फेम यशराज मुखातेने (yashraj mukhate) गाणं बनवलं आहे जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
[read_also content=”आर्थिक विंवचनेतून आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू! रस्त्यावर आढळला मृतदेह, सिनेसृष्टीतून शोक व्यक्त! https://www.navarashtra.com/latest-news/tamil-actor-mohan-found-dead-in-madurai-nrps-441199.html”]
यशराज मुखातेच हे गाणं आतापर्यंत 20 लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलं असून लोकांना ते खूप आवडतं आहे. यात यशराजने संवादात उत्तम संगीत देऊन मजा आणली आहे. यशराजच्या गाण्याच्या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. यावर लोक लिहितात- एवढ्या चिडखोर आवाजात बोललेल्या संवादातही तुम्ही संगीतमय तडका लावला आहे यावर विश्वास बसत नाही. अनेकांनी लिहिले – हे गाणं एक व्यसन आहे, मी 15 मिनिटे सतत ऐकत आहे.
‘तो किड्यासारखा मुलगा आहे…सोसाट्याचा वारा आला तर तो….’
नुकताच सचिनच्या शेजारणीचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती एका चॅनलशी बोलताना ती म्हणते, ‘प्रेमामागे काहीतरी कारण असावे. ही एक सामान्य गोष्ट आहे, एक माणूस असणे आवश्यक आहे. तो किड्यासारखा मुलगा आहे….किडा, जोराचा वारा तरी एवढ्या दूर जाईल की, माहीतही होणार नाही तो कुठे गेला आहे.
नेटकऱ्यांचे मजेशीर कमेंट
सचिनबद्दल बोलणाऱ्या या शेजारणीच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केले आहेत. युझर कोमलने लिहिले की, ‘एखाद्याने इतरांबद्दल असे बोलू नये.’ शंकरने लिहिले, ‘बहुतेक यांनाही व्हायरल होण्याची हौस आहे.’ नितीनने लिहिले की, ‘या मॅडमला सचिन किडा असल्याबद्दल खूप वाईट वाटत आहे.’ रश्मीने लिहिले की, ‘ही ईर्ष्या करणारा शेजारी आहे.’ ईशानीने लिहिले की, ‘तू एवढी अस्वस्थ का होत आहेस.’ अंकितने टिप्पणी केली, ‘यार, हा एक मोठा अपमान आहे.’ अनेकांनी मात्र, तिच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.