‘बिग बॉस 16’ चा (Bigg Boss 16) विजेता, रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) हा सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. हटके पर्सनॅलिटी आणि बोलण्याच्या वेगळ्या स्टाइलमुळे चर्चेत असणारा स्टॅन आता गर्लफ्रेंड बुबामुळे (Buba) चर्चेत आला आहे. एमसी स्टॅनने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं होतं की तो लवकरच बुबासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे आता बुबा कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
‘बिग बॉस 16’मध्ये एमसी स्टॅनने अनेकदा बुबाच्या नावाचा उल्लेख केला होता. स्टॅनची आई फॅमिली वीकमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात त्याला भेटायला आली तेव्हा म्हणाली होती की, “स्टॅन लवकरच बुबासोबत लग्न करणार आहे.” आपल्या रॅपने लाखोंच्या हृदयावर राज्य करणारा एमसी स्टॅन लग्नबंधनात अडकणार असल्याने त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
बुबा कोण?
एमसी स्टॅन त्याच्या गर्लफ्रेंडला ‘बुबा’ या नावाने हाक मारत असला तरी तिचं खरं नाव अनम शेख आहे. एमसी स्टॅन आणि 24 वर्षीय बुबाची लव्हस्टोरी अतिशय फिल्मी आहे. बिग बॉसच्या घरात स्टॅनने अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्माला त्याची लव्हस्टोरी सांगितली होती. स्टॅन म्हणाला होता की, “माझं बुबावर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहोत. त्यामुळे मी 30 ते 40 लोकांना घेऊन बुबाच्या घरी लग्नाची मागणी घालायला गेलो होतो. तिच्या घरच्यांना सांगितलं, आमच्या लग्नाला परवानगी द्या, नाहीतर तिला पळून घेऊन जाईन.” बुबा ही एमसी स्टॅनची दुसरी गर्लफ्रेंड आहे. याआधी त्याचं औझमा शेखसोबत नातं होतं. औझमासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने स्टॅनवर अनेक आरोप केले होते. त्यामुळे तो अडचणीतही आला होता.
एमसी स्टॅन त्याच्या आई-वडिलांना खूप मानतो. त्यामुळे आई-वडिलांना त्रास होईल अशी कोणताही गोष्ट एमसी स्टॅनला करायची नाही. त्याने लग्नानंतर आई-वडिलांना त्रास न देण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा आणि भांडण न करण्याची अट बुबाला घातली आहे.